२००७ ते २०१२ दरम्यान उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, त्यांचे गुरु कांशीराम आणि बहुजन समाज पक्षाचे (बसपा) चिन्ह असलेले हत्ती यांचे पुतळे लखनौ आणि नोएडा येथील उद्यानांमध्ये करदात्यांच्या पैशाने बांधल्याबद्दल २००९ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारी रोजी निकाल दिला. न्या. बी. व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र …
Read More »नाना पटोले यांची घोषणा, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार,राष्ट्रीय मतदार दिनी आंदोलन लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपा व निवडणूक आयोगाचा निषेध करणार
भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार …
Read More »दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर ५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला निकाल
दिल्लीत ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि तीन दिवसांनी अर्थात ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे, सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप), त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची राजकिय प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या दमदार कामगिरीनंतर आणि काही महिन्यांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा …
Read More »निवडणूक नियमात बदल काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव नागरिकांचे अधिकार कमी करण्यासाठीच हा बदल केल्याचा काँग्रेसचा आरोप
काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारने निवडणूक घेण्याविषयीचा नियम, १९६१ मधील नुकत्याच केलेल्या सुधारणांना आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्याद्वारे निवडणूक संबंधित नोंदींमध्ये प्रवेश करण्याचे नागरिकांचे अधिकार कमी केले गेले आहेत असा आरोपही यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. याचिकेनुसार, निवडणूक आयोग, जी एक संवैधानिक संस्था आहे, ज्यावर मुक्त आणि निष्पक्ष …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, राज्यात ७५ लाख मते कशी वाढली? वंचितने पाठवलेल्या पत्राला आरओकडून सरकारी उत्तर
ईव्हीएम EVM संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएम EVM संदर्भात एक बैठक बोलवणार आहोत. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ. यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर. ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण ७५ लाख मते कशी वाढली …
Read More »ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मागितली मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तीन प्रश्नांची उत्तरे आमच्या प्रश्नांची उत्तरे व चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालावरून आधीच महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहित वंचितने विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली …
Read More »नाना पटोले यांची मागणी, … दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी मारकडवाडीप्रमाणे राज्यातील अनेक गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामसभेचे ठराव
राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन …
Read More »भारत निवडणूक आयोगातर्फे मीडिया पुरस्कार-२०२४ साठी प्रस्ताव सादर करा आयोगाकडून प्रसार माध्यमांना आवाहन
राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रीत (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार …
Read More »नाना पटोले यांची मागणी, वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली?
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे आयोगाच्या निष्पक्ष व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; लोकशाहीसाठी धोक्याची घंटा
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे …
Read More »
Marathi e-Batmya