झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण आज राज्यातील शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत, या शब्दांत महाराष्ट्राच्या सत्तांतर नाट्यावर चिमटा घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, …
Read More »छगन भुजबळ यांचा खोचक टोला, आता “स्कूल चले हम – जीएसटी के साथ” म्हणाव… महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची भावना दिल्लीत पोहोचवा
जीएसटी परिषदेने सुचविलेल्या दरवाढीला देशभरात विरोध होत आहे. ही तांत्रिक दरवाढ आहे असे उत्तर सरकारकडून दिले जात असले, तरी आताच ती करणे टाळता आले असते आणि राज्यातील आणि देशातील जनतेला या महागाईला तोंड द्यायची वेळ आली नसती छोट्या छोट्या गोष्टींवर जीएसटी लावणे हे अन्यायकारक असून किमान अन्नधान्य, शालेय साहित्य व हॉस्पिटल बिलावरील …
Read More »नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांना डिझेलवर सबसीडी द्या जीएसटीवरील चर्चे दरम्यान केली मागणी
महागाईने जनता त्रस्त असून पेट्रोल, डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. शेतकरी नेहमीच संकटाचा सामना करत असतो. शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच इतर शेती कामासाठीही डिझेलचा वापर केला जातो. सध्याचे डिझेलचे दर जास्त असून शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. राज्य सरकारने डिझेलवर शेतकऱ्यांना सबसीडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी घोषणा; नव्या मंत्र्यांना आवाहन दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत-एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार
मागील दोन तीन महिन्यापासून राज्यातील जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आणि शेतजमीन खरवडून गेल्याचे तर उभ्या पिकात पाणी शिरल्याचे चित्र आजही पाह्यला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरीव मदत दिली जाणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली …
Read More »राष्ट्रवादीचा मोदींना सवाल; उत्पन्नाचे सोडा, महागाईमुळे त्या गोष्टीही मिळेना शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरून साधला निशाणा
येत्या १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. मात्र काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे जाहिर आश्वासन दिले. मात्र आता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्याबाजूला २०२२ मधील ६ महिने संपलेली असतानाही यातील …
Read More »शेतकऱ्यांना २०१७ सालापासून प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि ६ हजार कोटी निधी लागेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १३.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. ५७२२ कोटी इतका …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले “हे” अन्य तीन निर्णय झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी, मोफत बुस्टर डोस योजना राबविण्याचा निर्णय
राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसला तरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत निर्णय घेण्याचा धडका लावण्यास सुरुवात केलेली आहे. आज झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाच्या पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडूण देण्याचा निर्णय, …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील जाचक अटी काढणार-शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन …
Read More »अचानक झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली ‘या’ विषयावर चर्चा पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या, मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले असून एक गट एकनाथ शिंदे यांचा तर दुसरा गट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा झाला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आता शिवसेनेतील अंतर्गत लढाई न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. …
Read More »शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी: ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ
राज्यातील अस्थिर राजकिय वातावरणातही आज नेहमीप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याबैठकीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ तसेच २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात …
Read More »
Marathi e-Batmya