मुंबईः प्रतिनिधी नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तीला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा तीन दिवस काम बंद आंदोलन वैद्यकीय सेवांच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रूग्णालयातील चतुर्थश्रेणी सेवांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात या वर्गातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारी चतुर्त श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारला नुकताच दिला. यासंदर्भात संघटनेने जाहीर प्रसिध्दीपत्रकही काढले आहे. ११ ते १३ जून या कालावधीत तीन दिवस काम …
Read More »पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, विदर्भात आम्हीच येणार नाही तर राजीनामा देणार भाजपच्या मंत्र्यांकडून पैज
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात शेवटच्या टप्प्यात मतदान नुकतेच पार पडले. या चारही टप्प्यात राज्यातील जनतेमध्ये सत्ताधारी भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत जनतेमध्ये समिश्र चर्चा झडत होत्या. त्यामुळे २३ मे रोजी लागणारे निकाल काय असतील याबाबत आतापासूनच उत्सुकता असली तरी राज्य सरकारमधील भाजप मंत्री आतापासूनच महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या …
Read More »पालकमंत्री आणि आमदार दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि जनावरांच्या चाऱ्या देण्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याची सरकारची भावना आहे. मात्र आचारसंहिता असल्याने त्यात अडचण येत आहे. यासंदर्भात आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठविले असून त्याबाबतचा निर्णय येईल. तत्पुर्वीच प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री चारा छावण्या, पाण्याची परिस्थिती याचा आढावा घेतील अशी माहीती …
Read More »बाळासाहेबां सारखा दुसरा स्टार नाही
अभिनेता आमिर खान यांचे मत मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नसल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केले. लवकरच बहुचर्चित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ ठाकरे ’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट निर्माते, बड्या बँनरचे चित्रपट प्रदर्शित करणार …
Read More »अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला …
Read More »अहो राम कदम तुमचा नंबर त्या वाघिणीने घेतला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी घेतला वनमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांवर टीका
मुंबई : प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यात अवनी या वाघिणीची हत्येच्या मुद्यावरून चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार राम कदम बोलायला लागले. त्यावेळी त्यांना तालिकाअध्यक्षांनी बसायला सांगितले. मात्र ते तसेच बोलायला लागल्याने बोलण्यास उभे असलेल्या आमदार जयंतराव पाटील यांनी यांना खाली बसवा यांचं कौतुक उभ्या महाराष्ट्राने पाहिले आणि केले आहे. त्यामुळे यांना खाली …
Read More »आदीवासींच्या वनजमिनींची प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची प्रतिभा शिंदे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासींच्या जमिनीच्या प्रश्नी आठ महिन्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे पुन्हा याप्रश्नी मोर्चा काढल्यानंतर प्रलंबित राहीलेल्या जमिनीचे दावे पुढील तीन महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आदीवासी शेतकरी मोर्चाच्या समन्वयक प्रतिभा शिंदे यांनी दिली. आदीवासींच्या जमिनीच्या संदर्भात आठ महिन्यापूर्वी विधानभवनावर …
Read More »मंत्रालयात उदयनराजेंच्या भाजप मंत्र्यांशी गाठी-भेटी मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, महाजन यांच्याशी चर्चा
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मंत्री परिषदेच्या दिवशी मुंबईत मंत्रालयात येऊन भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या. उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उदयनराजे लोकसभेची जागा भाजपच्या तिकीटावर लढविणार आहेत. ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत, अशा देखील …
Read More »भूजल अधिसूचना राज्यातील शेतकऱ्यांना संकटात नेणारी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडाडून विरोध
मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच जाहीर केलेल्या महाराष्ट्र भूजल अधिसूचनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या नियमावलीची तातडीने अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. तसेच, या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या तोकड्या व अकार्यक्षम यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, …
Read More »
Marathi e-Batmya