मुंबई : प्रतिनिधी गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाच्या प्रस्तावाला अखेर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी ४ नावांबाबत तिन्ही पक्षांत अखेर एकमत होऊन सदर १२ नावांची यादी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. आज पार पडलेल्या …
Read More »“जनराज्यपाल” या पुस्तकावरून शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना टोला राज्यघटनेत जनराज्यपाल पदच नसल्याचे खोचक पत्र
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी पद स्विकारल्यापासून केलेल्या कामाचा आढावा पुस्तक स्वरूपात “जनराज्यपाल ” नावाने प्रकाशित केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना खोचक पत्र लिहिले. त्यामुळे राज्यात ठाकरे विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष महाराष्ट्राने अनुभवत असतानाच भविष्यात पवार विरुद्ध …
Read More »अखेर नाराज खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून २३ तारखेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षापासून माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखविणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज सकाळी भाजपाला सोडचिठ्ठी देत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी दिली. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला …
Read More »अखेर महिलांना लोकल प्रवास करण्यास रेल्वेमंत्र्यांनी दिली मान्यता पियुष गोयल यांची ट्विटरवरून मान्यता
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरातील चाकरमानी असलेल्या महिलांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर त्यावर रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डाच्या मान्यतेचा प्रश्न पुढे करत महिलांना प्रवास करण्यास परवानगी नाकारली होती. अखेर त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आपली चुप्पी तोडत लोकल रेल्वेने प्रवास करण्यास मान्यता देण्याचे आज जाहीर करत महिलांना उद्यापासून …
Read More »पवारांची स्पष्टोक्ती अतिवृष्टीच्या निमित्ताने राज्यावर आर्थिक संकट, पण दिले हे आश्वासन मुख्यमंत्र्यांशी बोलून विनंती करणार पाहणी दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची माहिती
तुळजापूर: प्रतिनिधी संकटाचं स्वरूप लक्षात घेता स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यावर आर्थिक संकटही आलं नाही. पण या पावसाने आणलंय. त्यामुळे आता या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही आणि ते कर्ज आपण काढणार असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्यांशी बोलून कर्ज काढण्याची विनंती करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी …
Read More »पवार म्हणाले शेतकऱ्यांना, अडचणींवर एकजुटीने मात करु… सरकार तुमचं आहे बांधावर जात अतिवृष्टीग्रस्तांना दिला धीर
तुळजापूर-उस्मानाबाद : प्रतिनिधी हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उध्वस्त करणारं आहे. त्यामुळे तातडीची मदत कशी देता येईल… खरवडून गेलेली जमीन कशी सावरता येईल आणि नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत कशी होईल ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत. या संकटावर… आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करु. सध्या दिवस वाईट आहेत… अडचणीचे आहेत. परंतु …
Read More »कोरोना संकटकाळात ८५ हजार ४२८ बेरोजगारांना मिळाला रोजगार कौशल्य विकास व रोजगार मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ८५ हजार ४२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक …
Read More »रविवारपासून शरद पवार या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वात नुकसान झालेल्या उस्मानाबाद, औसा, तुळजापूर,परांडा येथील गावांना भेटी देणार
मुंबई : प्रतिनिधी गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून दोन दिवसाच्या दौर्यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यात शरद पवार शेतकर्यांच्या थेट बांधावर जावून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी …
Read More »महाविकास आघाडी सरकार विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मागणी राष्ट्रपतींना ऐकवा सांगत याचिकाकर्त्यांना फटकारले
नवी दिल्ली: प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्याप्रकरणी करण्यात आलेल्या तपासात योग्य पध्दतीने करवाई झालेली नसल्याने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच अशा पध्दतीची मागणी करायची असेल तर ती …
Read More »भाजपाची ती मागणी म्हणजे राजकीय द्वेष आणि तेढ पसरवण्यासाठीच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी सुडबुद्धीने… राजकीय द्वेष पसरवण्यासाठी… जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपाची लोकं मदरशाचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. वर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना का सुचली नाही याचं उत्तर जनतेला …
Read More »
Marathi e-Batmya