Tag Archives: prakash ambedkar

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, तुमची मते घेणारे पक्षच आरक्षण संपवतायत क्रिमीलेयर आणि उपवर्गीकरण हा आरक्षण संपवण्याचाच डाव

अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उप-वर्गीकरणाची अंमलबजावणी हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटवरून केला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सामाजिक न्याय चळवळीला हा मोठा धक्का आहे. अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उप-वर्गीकरणाची अंमलबजावणी हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव आहे. …

Read More »

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. सीताराम घनदाट यांना गंगाखेड …

Read More »

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, अधिकाऱ्यांनी पदरचे ५० हजार खर्च करून आरक्षण वाचवा आरक्षण वाचवण्यासाठी 'वंचित'ला मतदान करा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या क्रिमीलेयरबाबतच्या आदेशाबाबत तमाम फुले शाहू आंबेडकवादी विचारांच्या अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन करत म्हणाले की, निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे पन्नास हजार रुपये खर्च करून आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवा. वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन हे आरक्षण आपण वाचवाल अशी अपेक्षाही व्यक्त केली. ॲड. …

Read More »

वंचित बहुजन आघाडीकडून आणखी उमेदवारांची ४ थी यादी जाहिर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघातील उमेदवारांची यादी

लोकसभा निवडणूकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीची युती करण्याच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुर होत्या. मात्र महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील चर्चा यशस्वी न झाल्याने मागील निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी एकला चलो रे म्हणत आपले उमेदवार उभे करत सात जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, निवडणूक आयोगात फूट पाडून राजकीय लाभ घ्यायचाय फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण

फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपाने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटले कॅलिफोर्निया आणि दाऊदला भेटण्यासाठी केंद्र सरकारची पवारांना परवानगी होती का ?

शरद पवार १९८८-९१ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, आरक्षण टिकवायचं असेल तर ‘वंचित’ च वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या

राजकीय पक्ष आरक्षण काढायला निघाले आहेत. आरक्षण वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून आणणे. ओबीसींचेही आरक्षण राहील, एससी एसटी यांचेही आरक्षण राहील. क्रिमीलेयर सुद्धा जाईल हे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचा साथ द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महायुती सरकारचा निर्णय आरक्षित समूह आरक्षणापासून वंचित निवडणूकीच्या धामधुमित महायुती सरकारचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणात क्रिमी लेयर लागू करण्याच्या दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षित असलेला समूह आरक्षणाच्या लाभापासून कायमचा वंचित राहणार असल्याचा आरोप केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख …

Read More »

वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवारांची यादी जाहिरः खतीब यांच्यासह ९ मुस्लिम नेत्यांचा प्रवेश काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वावर नाराज नतिकोद्दीन खतीब यांचा ९ अन्य मुस्लीम नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेसच्या सॉफ्ट-हिंदुत्वावर नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खतीब सैय्यद नतीकोद्दीन यांचा इतर ९ मुस्लिम नेत्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. मुस्लिम प्रतिनिधीत्व मुद्द्यावर समझोता नाही करू शकत नाही असे खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभेच्या काळात मुस्लिमांना उमेदवारी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, क्रिमीलेयरच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव आरक्षण वाचवायचे असेल, तर 'वंचित'ला सत्तेत निवडून द्या

शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मत द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »