राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै २०२६ पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची …
Read More »प्रताप सरनाईक यांचे निर्देश, अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्र
राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली. त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे. …
Read More »प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, व्यावसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज अमराठी ड्रायव्हरंना मराठी भाषा शिकविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. रंगशारदा मंदिर येथे आयोजित हिंदी भाषिकांच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या “वर्धापन दिन व जल्लोष मेळावा” …
Read More »परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार
राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने १ मे ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त परिवहन आयुक्त रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ४ सदस्यीय समितीकडे सोपविण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती “आपली बस, आपली सेवा” १ मे पासून एसटीचे नवे अभियान एसटी बसेसची संख्या वाढतेय, तरी प्रवासीसंख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नाही
महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “आपली बस आपली सेवा” या व्यापक अभियानाच्या माध्यमातून प्रवासी सेवेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या ७२ शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी
रिक्षा, टॅक्सी तसेच ई-बाईक टॅक्सी सेवांमधील व्यावसायिक वाहनचालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेशी निगडीत साहित्यिकांनी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर ग्रीड सोलर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज निर्मिती करून तीच ऊर्जा वापरण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹१३.०३ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून, यामुळे एसटीच्या ऊर्जावापरात मोठी बचत होऊन पर्यावरणपूरक पाऊल …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक अन्यथा लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि चालकावर कारवाई करणार
येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्यात रस्ते अपघात व त्यातील बळींची संख्या उच्चांकी पातळीवर!
राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणा-या नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची व बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा …
Read More »कल्याण जवळ झालेल्या अपघाताबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांचे संवेदनशील निवेदन कमी क्षमतेच्या वाहनात जास्तीचे प्रवाशी, ११ प्रवाशांचा मृत्यू
आज १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. …
Read More »
Marathi e-Batmya