Tag Archives: varsha gaikwad

वर्षा गायकवाड यांची मागणी, रेल्वे तिकिटातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा सुरु करा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून निवेदनाचे दिले पत्र

भारतीय रेल्वेमध्ये मार्च २०२० पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळत होती मात्र ही सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट संपून तीन वर्षे झाली तरी अद्याप ही सवलत सुरु केलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात दिलेली सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, ४०० वर्षांचे चिंबई गावठाण झोपडपट्टी कसे? मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख नष्ट करण्याचे भाजपा युती सरकाचे षडयंत्र

राज्यातील भाजपा युती सरकार हे लाडक्या बिल्डर मित्रांसाठी काम करते हे नवे नाही पण उद्योगपती, बिल्डर धार्जिणे भाजपा युती सरकार आता भूमिपुत्रांच्या हक्कावर गदा आणत आहे. एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी वांद्र्यातील ४०० वर्षे जुन्या चिंबई गावठाणला झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना बेदखल करण्याचे हे षडयंत्र असून बिल्डर मित्रांच्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी,… गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांचे पूनर्वसन वांद्र्यातच करा वांद्र्यातील रहिवाशांचे मालाड-मालवणीत पुनर्वसन का? ३०५ चौरस फुटांची घरे देण्याच्या हमीचे काय झाले?

मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन वास्तूचा प्रकल्प वांद्रे शासकीय वसाहतीत उभारला जात आहे. या प्रकल्पाला कुठलाही विरोध नाही. मात्र, गेल्या ५० वर्षांपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांवर आणि व्यावसायिकांवर अन्याय करु नका. स्थानिकांचे पुनर्वसन वसाहतीतच किंवा जवळच्या परिसरातच करावे आणि या मागणीवर निर्णय होईपर्यंत PAP सदनिकांची वाटप प्रक्रिया आणि सोडत कार्यक्रमाला स्थगिती द्यावी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख पण मुंबई व महाराष्ट्राच्या… भाजपा सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आघाडी सरकार वाचवण्यासाठी केलेली धडपड

भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त बिहारचीच चर्चा करण्यात आली असून मुंबई व महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक असून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, … काम सुरु नाही, पुलाचे काम तातडीने सुरू करा मुंबईची लाईफलाईन बनली 'डेथलाईन', लोकल अपघातात दररोज होणारे मृत्यू थांबवण्यासाठी तत्काळ पावले उचला

भाजपा युती सरकारचा सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. पुनर्बांधणीसाठी सायन पूल बंद करून ५ महिने उलटले तरी अजून काम सुरू झालेले नाही, त्यामुळे स्थानिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना अरुंद आणि असुरक्षित पदपथावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. स्थानिक मुंबईकरांचे होणारे हाल रेल्वे प्रशासन, बीएमसी व …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …

Read More »

सायन पुल प्रश्नी भाजपा सरकारच्या उदासीनतेविरोधात मुंबई काँग्रेसचे आंदोलन खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, सायन पुलाच्या संथ गतीच्या बांधकामाचा स्थानिकांना प्रचंड त्रास

सायन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा मोठा फटका स्थानिक मुंबईकरांना बसत आहे. दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना जीव मुठीत धरून धोकादायक पदपथावरून ये-जा करावी लागत आहे. शाळकरी मुलांनाही जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करावी लागत असल्याने पालक सतत चिंतेत असतात. सायन पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे अन्यथा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा इशारा, …. जमीन अदानीच्या घशात जाऊ देणार नाही मुंबईकरांचा आवाज दडपण्यासाठी मोदानी सरकारकडून पोलीस बळाचा वापर

अदानीविरोधात सर्वसामान्य जनता आवाज उठवते तेव्हा मोदानी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीच्या लुटीविरोधात लोकशाही मार्गाने निदर्शने करत असताना अदानीचे एजंट भाजपा सरकारने पोलीसांना पुढे करुन आंदोलकांना रोखले, धक्काबुक्की केली. मुंबईकरांचा आवाज दडपण्याच्या अशा कोणत्याही प्रयत्नांना काँग्रेस भीक घालत नाही. मोदानी सरकारने कितीही …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा सरकारची सर्व मदत ‘लाडक्या अदानीसाठी’ मदर डेअरतील आगीची घटनाही संशयास्पद

कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीची मोजणी पोलीस फौजसाठ्यासह सक्तीने सुरू मोदानी आणि कंपनीला मुंबई लुटू देणार नाही; मुंबईचा स्वाभिमान व अस्मितेसाठी काँग्रेस सर्वशक्तीने लढा देईल असा इशारा देत मुंबईतील जमीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका उद्योगपती अदानीच्या घशात घालण्यासाठी फडणवीस शिंदे पवार सरकार तत्परतेने कामाला लागले आहे. मुंबईचे लचके तोडणा-या अदानीच्या फायद्यासाठी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे कायदा व सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडाला; मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर रात्री त्यांच्या घरात झालेला जिवघेणा हल्ला ही अत्यंत गंभीर घटना आहे. वांद्र्यासारख्या भागात अशा प्रकारची ही तिसरी घटना घडलेली आहे. आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार व आता सैफ अली खानवरील हल्ला. सैफ अली खानवरील हल्ल्याने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे …

Read More »