Breaking News

अखेर अक्षय शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार स्मशानमभूमीत दफन स्थानिकांचा विरोधाला न जुमानता केला दफनविधी

बदलापूर प्रकऱणातील अनेक गोष्टी उघडकीस येण्यापूर्वीच बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकांऊटर करत पोलिसांनी संपविले. त्यानंतर अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याला दफन करण्यात यावे अशी मागणी त्याच्या पालकांनी आणि न्यायालयानेही तसे आदेश दिले. मात्र अक्षय शिंदे याच्या मृतदेह दफन करण्यासाठीही जमीन मिळत नव्हती. अखेर अक्षय शिंदे याचा मृतदेह पोलिसांनी बळाचा वापर करत उल्हासनगरातील शांतीनगर येथील स्माशनभूमीत करण्यात आला.

अक्षय शिंदे यांच्यावर शांतीनगरमधील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात येणार असल्याचे समजताच स्थानिक भागातील नागरिकांना या दफनविधीस विरोध केला. त्यामुळे अक्षय शिंदे यांच्या मृतदेहासाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला. दरम्यान आज अक्षय शिंदे याचा मृतदेह शांती नगरातील स्मशानभूमीत करण्यात येणार असल्याचे कळताच स्थानिक भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्मशानभूमीत जमा झाले आणि पोलिसांना विरोध करू लागले.

दरम्यान या विरोधाची संभाव्य शक्यता गृहीत धरून पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त स्मशानभूमीच्या आवारात आणि बाहेरही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दुपारी अक्षय शिंदे याचा मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला त्यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत दफन करण्यास विरोध केला. मात्र पोलिसांनी अक्षय शिंदे च्या मृतदेहाच्या दफणास विरोध करणाऱ्या नागरिकांचा विरोध मोडून काढत त्यांना स्मशानभूमीबाहेर काढले. त्यानंतर अक्षय शिंदे यांच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले.

पोलिसांच्या एनकांऊटरमुळे एखाद्या पाकिस्तानी दहशतवाद्यांप्रमाणे अक्षय शिंदे यांच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी जागा मिळू नये यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असेल अशी काही सुजाण नागरिकांमध्ये कायद्याचा आणि समाजशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत