मुंबईत साध्या वेषातील पोलिसाकडून आंदोलक महिलेशी गैरवर्तनः पोलिसांकडून मात्र सारवासारव पुरुष आंदोलकाला रोखण्याच्या नादात म्हणे महिला मध्ये आली

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेला एक साध्या वेषातील पोलीसाने आंदोलनादरम्यान एका महिलेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने पकडून रोखण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत असून यासंदर्भात विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून यासंदर्भात आवाज उठवताच पोलिसांनी मात्र दावा फेटाळून लावला. पोलिसांनी स्पष्ट केले की, तो पोलीस एका पुरुष आंदोलकाला रोखण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा ती महिला नकळतपणे मध्ये आली.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी ‘एक्स’वर ही क्लिप शेअर केल्यानंतर, पोलिसांनी सांगितले की या दृश्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वाद निर्माण झाल्याने, मुंबई पोलिसांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये हे आरोप फेटाळून लावले आणि म्हटले की त्यांच्या कर्मचाऱ्याच्या वागणुकीचा “बेजबाबदार” अर्थ लावला जात आहे.

वर्षा गायकवाड यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, तो पोलीस एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसरीकडे पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली असल्याची सारवा सारव केली.

त्या लोकप्रतिनिधीने लिहिले होते, “मुंबई पोलिसांचे हे काय वर्तन आहे? एक पुरुष पोलीस एका तरुण महिला आंदोलकाशी अशाप्रकारे गैरवर्तन का करत आहे? तो त्याच्या महिला सहकाऱ्यांना हे प्रकरण हाताळू का देत नाही? त्याच्यावर काय कारवाई केली जाईल? हे अस्वीकार्य आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले होते.

या दाव्याला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी लिहिले, मॅडम, कृपया नोंद घ्या, याचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे – तो अधिकारी, तेथे कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना, एका पुरुष आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा एक महिला नकळतपणे मध्ये आली, आणि त्याचे लक्ष दुसरीकडे होते अशी एक्सवर सारवा सारव केली.

मुंबई पोलीसाने पुढे म्हटले, एक सार्वजनिक व्यक्ती म्हणून, व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ लावण्यापूर्वी तुम्ही तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची पडताळणी केली आहे आणि तथ्ये काढण्यासाठी व्हिडिओचे बारकाईने मूल्यांकन केले असल्याचा दावा केला.

या क्लिपवरून झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) नेते रोहित पवार यांनीही त्या पुरुष पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. या आरोपांसंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गुरुवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी आंदोलकाना पांगवले, या घटनेत काही तरुण खाली पडले.

About Editor

Check Also

समुद्रात शनिवारी झाला कमी तीव्रतेच्या भूकंप; त्सुनामीचा कोणताही धोका नाही किनारपट्टीवरील नागरिक - पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन, अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (High Tide) २४ तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *