राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणात असलेला धबधबा वजन कमी करण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे त्यानुसार हे काही गोष्टी घडत आहे. साहेबांन विरोधात अस्वस्थता निर्माण करायची त्यांच्या जवळचे माणसं त्यांच्या नेतृत्वाविषयी बोलतात. सर्व त्यांच्याकडून बळजबरीने बोलून घेण्यात येते की? माहित नाही, परंतु पवार साहेबांची छबी खराब करण्याचा …
Read More »मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. मंत्री संजय राठोड म्हणाले की, शासन अधिसूचना २१ सप्टेंबर २०२१ नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या पदांचे …
Read More »भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन
राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार …
Read More »राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत १०० टक्के लसीकरण करा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण ७३ टक्के करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण ७ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील, …
Read More »अजित पवार यांचे आश्वासन, धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा धनगर आणि मेंढपाळ समाजाप्रश्नी बैठकीत दिले आश्वासन
धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित …
Read More »गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देतानाच गिरणी कामगारांच्या घरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावत असल्याची …
Read More »जपानच्या निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस यांचा ५ दिवसांचा दौऱ्यावरः या गोष्टींचा घेतला अनुभव पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना
जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. मात्र आज जपान सरकारच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पोहचल्यानंतर त्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतला. अत्त दीप भव… 🕔4.50pm JST | 🕐1.20pm IST21-8-2023 …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, कांद्याला भाव नसताना मोदी सरकार झोपले होते का? निर्यातशुल्कात वाढ ४०% करण्याचा मोदी सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांला मागील काही दिवसात चांगला भाव मिळत असल्याने चार पैसे मिळत होते पण केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारला शेतकऱ्याचे हे सुख पहावले नाही. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के करून कांद्याचे भाव पाडण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या थापा मारणाऱ्या मोदी सरकारने कांद्याचे उत्पादन …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, हे शासन कलाकारांना संधी देणारे अन् त्यांचा सन्मान करणारे राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
एखाद्या कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे असते. हे शासन कलाकारांना संधी देणारे आणि त्यांचा सन्मान करणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण’ सोहळ्याप्रसंगी ते बोलत …
Read More »रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान
रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून …
Read More »
Marathi e-Batmya