मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, केवळ राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. जर राज्यातील सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधेयक आणायला सांगितले पाहिजे. जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी …
Read More »पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य, मी वेगळा निर्णय घेणार वेगळ्या स्वतंत्र राजकिय पक्षाचे सुतोवाच
गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यातील शक्तीपीठांच्या यात्रेवर असून शिवा शक्तीने माझ्या डोक्यात घातले की लोकांचे दर्शन घे म्हणून मी आशिर्वाद घेण्यासाठी इथे आले आहे. मात्र माझा या ठिकाणी अनोखा सन्मान केला मी कोणत्याही पदावर नसताना असे माझे मोठे स्वागत केले. यातच माझी यात्रा सफल झाली. आगामी निवडणुका आधी मी यात्रा काढणार …
Read More »नाना पटोले यांचा टोला, देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात शांततेने आंदोलन सुरु असताना शुक्रवारी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पोलीसांनी निर्दयीपणे मारहाण केली, लोकांची डोकी फोडली. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती त्याला देशभर प्रसिद्धी मिळत होती त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक केला आहे. फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली, असे काँग्रेस …
Read More »बंद पडलेली एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या एलआयसीची नवीन मोहीम बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु होऊ शकते
तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल, परंतु काही कारणास्तव तुमची पॉलिसी बंद झाली असेल तर ती पुन्हा सुरू केली जाऊ शकते. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने वैयक्तिक लॅप्स झालेल्या पॉलिसींच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. एलआयसीने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी आपला ६७ वा वर्धापन दिन साजरा केला. या वेळी एलआयसी एक …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपालांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना समज द्या… तर लाठिमार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अंबादास दानवे यांची मागणी
सरकारी कार्यक्रमासाठी लाठीचार्ज झाला. आम्ही अडीच वर्षे सरकारमध्ये होतो. त्यामुळे पोलिस स्वताहून लाठीचार्ज करत नाहीत. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांकडून आदेश आल्याशिवाय पोलिसांकडून काम केले जात नाही. तरीही शांततेत मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठिमार करण्यात आला. हा लाठिमार गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरच करण्यात आल्याने राज्यपालांनी घटनाबाह्य मुंख्यमंत्र्यांना समज द्यावी अशी मागणी …
Read More »शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ तीन लाख शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये अनुदान वितरीत होणार
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यानी दिली. मंत्रालय …
Read More »आयसीआयसीआय बँकेकडून एफडी व्याजदरात सुधारणा 'इतके' मिळेल व्याज
खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने २ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. नवीन दर ४ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. आयसीआयसीआय बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या बल्क एफडीमध्ये गुंतवणुकीची संधी देते. या एफडीवर ग्राहकांना बँकेकडून ४.७५ टक्के ते ६.७५ टक्के व्याजदर दिला जात आहे. …
Read More »महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना उत्तम, २ वर्षात बंपर परतावा पोस्ट ऑफिसने आणली महिलांसाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट योजना
भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो लोकांना चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिस देखील महिलांसाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट योजना राबवत आहे. महिलाही या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवत आहेत. तुम्ही देखील एक महिला असाल आणि तुमच्यासाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय शोधत …
Read More »ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलचा आयपीओ आज उघडला, ग्रे मार्केटमध्ये शेअर्स मजबूत अँकर गुंतवणूकदारांकडून २६०.७२ कोटी रुपये गोळा
ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलचा आयपीओ आज ३ सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडला आहे. यापूर्वी आयपीओ उघडण्यासाठी कंपनीने ५ सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून २६०.७२ कोटी रुपये गोळा केले आहेत. गुंतवणूकदारांना ७३५ रुपये किमतीने शेअर्स जारी करण्यात आले आहेत. ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलने मंगळवारी अँकर गुंतवणूकदारांकडून एकूण २६०.७२ कोटी रुपये उभे केले आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya