Editor

नाना पटोले यांची टीका; हे ‘कुराज्य’ लवकर जावे, हीच राज्यातील जनतेची इच्छा भ्रष्ट, ईडी सरकारच्या वर्षभराच्या कार्यकाळात महाराष्ट्र १० वर्ष मागे

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन वर्ष झाले. हे एक वर्ष गद्दारी, राज्यातील जनतेशी केलेली बेईमानी तसेच दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला १० वर्ष अधोगतीकडे घेऊन जाणारे ठरले आहे. राज्यात हे असंवैधानिक, असंवेदनशील, भ्रष्ट ‘कुराज्य’ असावे असे स्वाभिमानी जनतेला अजिबात वाटत नसून लवकरात लवकर जावे हीच …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी मानले ऊसाच्या एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी पंतप्रधानांचे आभार ऊसाला ३१५ रुपये प्रती क्विंटल तर ३.६८ लाख हजार कोटींची युरिया सबसिडी ३ वर्षांसाठी

केंद्र सरकारने युरियावर ३ वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा मी नितांत आभारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने …

Read More »

त्या घटनांवरून शरद पवार यांनी टोचले कान, राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्यापेक्षा…. पुण्यातील दर्शना पवार आणि मुलीवरील कोयता हल्यावर देवेंद्र फडणवीसांना सुनावले

पुण्यात गेल्या दोन आठवड्यांपासून दोन थरारक घटना घडल्या.एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिची राजगडावर हत्या करण्यात आली. तर, सदाशिव पेठेत भर रस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. या दोन्ही प्रकरणांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले. यावेळी त्यांनी आकडेवारीसहित …

Read More »

दिल्लीत औरंगजेबाचे नाव असलेल्या रस्त्याला डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव नवी दिल्ली नगरपालिकेच्या मंजूरीनंतर रितसर नामकरण

नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) बुधवारी लुटियन्स दिल्लीतल्या एका रस्त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील एका रस्त्याचं नाव औरंगजेब लेन असं होतं जे आता बदललं जाणार आहे. या रस्त्याला भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलं जाणार आहे. एनडीएमसीच्या बैठकीत बुधवारी २९ जून रोजी याबाबतच्या निर्णयाला …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, राहुल गांधींना मणिपूरच्या लोकांना भेटू न देणे ही हुकुमशाही मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची कृती ‘रोमच्या निरो’ पेक्षाही असंवेदनशील

मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार ५२ दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्भाग्य आहे. ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या प्रवृत्तीलाही लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला आहे. केंद्र सरकार स्वतः काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे …

Read More »

फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, अजित पवारांना….ते विकेट गेल्याचे सांगतायत आम्ही फसवलं पण तुम्ही का फसलात ? फडणवीसांवर पलटवार

एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच अचानक पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले. त्या मागे नेमके कोणं होतं याची उत्सुकता अद्यापही राज्यातील जनतेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

पंतप्रधानांच्या टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर, स्वकर्तृत्वशिवाय जनता मतदान करत नाही… सुप्रिया सुळे या स्वर्तृत्वावर निवडूण येतात, कामाचे कौतुक संसदरत्न पुरस्कारने

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह देशातील सर्व विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत चांगलेच सुनावले. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेली टीका अशोभणीय असून प्रत्येक वेळी मुला-मुलींना …

Read More »

त्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, शरद पवारांनी डबल गेम खेळला.. आधी चर्चा केली आणि नंतर भूमिका बदलली

राज्यात २०२४ च्या निवडणूकांना आता एक वर्षाचा कालावधी राहिलेला असतानाच भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणूकीत औट घटकेच्या भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. २०१९ साली विधानसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस …

Read More »

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ मेट्रो शहरांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद

समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी केंद्र सरकारचा ५० टक्के व राज्य शासनाचा ५० टक्के या प्रमाणात निधी दिला जातो. या योजनेंतर्गत प्रती जोडप्यास रुपये ५० हजार अर्थसाहाय्य देण्यात …

Read More »

अनधिकृत शाळांची यादी तर जाहिर पण ना दंड आणि गुन्हा मुंबई महानगरपालिकेची हाताची घडी तोंडावर बोट

मुंबई महानगर पालिका प्रत्येक वर्षी अनधिकृत शाळेची यादी जाहीर करते पण नियमाप्रमाणे दंड आणि गुन्हे दाखल केले जात नाही. दाखल केलेला गुन्हा आणि दंडाची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली असता कार्यवाही सुरु असल्याचे थातुर मातुर उत्तर शिक्षण खात्याने दिले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या शिक्षण खात्यास …

Read More »