काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अमरावतीत बोलताना १४ फेब्रुवारीला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याचे भाकित केले होते. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, नाना पटोले यांनी केलेले सरकार कोसळण्याचे वक्तव्य तथ्यहीन व हास्यास्पद आहे. उलट राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला आणखी सुमारे २० आमदारांचा पाठिंबा वाढेल, …
Read More »अखिलेश यादव यांचे भाकित,…तर भाजपाचा ८० जागांवर पराभव होईल.. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वैद्यकीय महाविल्यालयांना भेटी द्याव्या मग कळेल
उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी चांगलीच लढत देत भाजपाचा जवळपास ५० जागांवर पराभव केला. तसेच ३०० पार असलेल्या भाजपाला २५० जागांवर रोखले. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूकीत ८० जागांवर भाजपाचा पराभव होऊ शकतो असे भाकित केले. विशेष म्हणजे भाजपाने आगामी २०२४ च्या लोकसभा …
Read More »दिग्गज अभिनेते निळू फुलेंचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून उलघडणार स्वतः अभिनेते प्रसाद ओक यांनीच व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
मागील काही वर्षात विविध महापुरूषांबरोबरच चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील उत्तुंग अभिनेत्यांच्या जीवनावरील चरित्र पटांचा ट्रेंड वाढला आहे. आता यात मराठी चित्रपटातील आपल्या खलनायकीच्या अदानी आणि ग्रामीण भागातील बेरक्या राजकारणी व्यक्तीरेखेबरोबरच, विनोदी भूमिका साकार करत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे दिग्गज अभिनेते निळूभाऊ फुले यांच्या जीवनावरील चरित्रपट लवकरच येणार आहे. निळू …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, त्या नारायणशी मिळती- जुळती वाक्ये शरद पवारांचे मार्गदर्शन घेतो या मुख्यमंत्री शिंदेंच्या या वक्तव्यावरून अंधारेंची टोलेबाजी
नुकतेच पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळीत शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांची तुलना …
Read More »अबू आझमी म्हणाले, …मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही त्याच मार्गावर महापुरूष आणि राजे महाराज्यांना धार्मिक ठरविण्यावरून केला आरोप
आज पुण्यात कथित हिंदूत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक नव्हे तर धर्मवीर होते असे जाहिर करण्यात आले. यावेळी या संघटनांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर टीकाही करण्यात आली. या मोर्चाबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारमधील लोकं हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ …
Read More »बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार या संस्था आणि व्यक्तींना जाहीर डॉ. प्रमोद पोतदार, डॉ.उमेश कदम, डॉ. सदानंद राऊत, संदीप आचार्य मानकरी
सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्कार बाबतची माहिती देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री …
Read More »लेखक भगवान यांचे मोठे विधान, राम आणि सीता दिवसभर मद्य प्यायचे शंभूकाचा वध करणारा राम आदर्श कसा असेल?
२०१४ पासून देशात हिंदूत्वाचा नारा बुलंद होत आहे. त्यातच अयोध्येतील रामाच्या जन्मभूमीप्रकरणी अर्थात बाबरी मस्जिद प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडून हेतूपुरस्सर वाल्मिकी रामायणातील राम-सीतेचा जयघोष करत हिंदू धर्मियांच्या भावनेला हात घालत हिंदूधर्मियांची व्होट बँक बळकट करत राजकिय स्थान पक्के केले. मात्र भाजपा आणि राष्ट्रीय …
Read More »बीबीसीचा गुजरात दंगलीवरील माहितीपट ट्विटर आणि युट्यूबवर ब्लॉक मोदी सरकारच्या आदेशानुसार समाजमाध्यमांवर ब्लॉक केल्याची माहिती
गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी हे असताना गुजरातदंगल झाली. त्या दंगलीत अनेक मुस्लिमांचे शिरकाण करण्यात आले. तसेच ग्रोधा येथे प्रवाशांसह रेल्वे एक्सप्रेस जाळण्यात आली. तसेच याच दंगलीत बिल्कीस बानो या महिलेवर सामूहिक बलात्काराचे दुर्दैवी प्रकरणही घडले. त्यानंतर गुजरातमधील दंगलीवरून अनेक चित्रपट आणि अनेक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आल्या. त्या सगळ्यांमध्ये त्यावेळच्या …
Read More »नाना पटोंलेनी केले भाकित, व्हॅलेंनटाईनच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार १४ फेब्रुवारीला न्यायालयात १६ आमदार अपात्र ठरणार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची कायदेशीर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरु आहे. मात्र उध्दव ठाकरे गटाने या प्रकरणाची ५ सदस्यीय खंडपीठाऐवजी ७ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे ५ सदस्यांचे घटनापीठ पुढील सुनावणी घेणार की सात सदस्यीय घटनापीठाकडे याचिका वर्ग करणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली …
Read More »भारतीय कुस्ती फेडरेशनने पत्र पाठवित बृजभूषण सिंग यांना दिली क्लीनचीट केंद्रीय क्रिडा मंत्रालयाला पाठविले पत्र फेटाळले आरोप
मुंबईमध्ये आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपाचे खासदार तथा भारतीय कुस्ती फेडरेशन अध्यक्ष बृजभूषण सरण सिंग हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली. तसेच राज ठाकरे आणि आपल्यात वैयक्तीक वाद नसल्याचे पुण्यात जाहिर केले. त्यानंतर लगेचच हरयाना आणि दिल्लीतील काही …
Read More »
Marathi e-Batmya