उद्धवजींच्या सेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची वक्तव्ये सध्या समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान हा महाराष्ट्र द्रोह नाही का? असा उद्धवजींना माझा प्रश्न आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान करणे, हिंदू मनाला इजा पोहोचली जाईल, अशी वक्तव्ये …
Read More »जंयत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा दिल्लीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हे शरण गेलेत का?
राज्यपाल व भाजपाचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीच्या प्रमाणात अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपाचे सरकार करत आहे. त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय
विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. या भागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची संख्या वाढवून कोस्टल रोड प्रकल्प …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, सीमाप्रश्नाची बैठक फक्त १५ मिनिटात झाली? सीमाप्रश्नी होयबा मुख्यमंत्री दिल्लीची वाट पहात होते का?
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. मात्र ही बैठक फक्त १५ मिनिटात आटोपल्याबाबतचा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून विचारला असता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयावरची बैठक फक्त १५ मिनिटात कशी काय पार पडली?. असो त्या बैठकीत काय ठरले ते ठरले. …
Read More »त्या वादावर शाहरूख खानची पहिली प्रतिक्रिया, माणसाला मर्यादा घालणाऱ्या… बेशरम रंग गाण्याच्या वादावर कोलकाता येथील कार्यक्रमात व्यक्त केले मत
मागील काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. त्यातच या चित्रपटातील बोल्ड दृश्ये आणि दिपिका पदुकोणने परिधान केलेली भगवी बिकिनी यामुळे हिंदूंचा अपमान होत असल्याचा आरोप हिंदू महासभा आणि काही भाजपा नेत्यांनी केला. अशातच चित्रपटावर बॉयकॉट करण्याची मागणीही सोशल मीडियावरही …
Read More »अजित पवार म्हणाले, परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच… केंद्र सरकारच्या मनात असेल तर यातून 'दूध का दूध, पानी का पानी होऊ दे... ट्वीटरवरील बातमीमागे मास्टरमाईंड शोधा...
राजकीय मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत. सरकार कुणाचेही असले तरी असे मोर्चे येतात परवानगी दिलेली नाही हे माझ्या ऐकीवात नाही. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परवानगी मागण्याचा अधिकार आहे परवानगी नाकारण्याचा अधिकार त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्ही मोर्चा काढणारच आहे. आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य …
Read More »काँग्रेस म्हणते, समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा सरकारचा हेतू शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रती काळा कायदा आणू इच्छिते...
महिला संरक्षणाच्या नावाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व या कायद्याला समस्त महिलावर्गाने विरोध करावा असा आग्रह …
Read More »‘बेशरम रंग’च्या वादावर प्रकाश राज म्हणाले, मग बलात्कारी स्वामी कसे चालतात? दिपिका पदुकोनच्या भगव्या बिकनीवरून वाद
शाहरूख खान आणि दिपिका पदुकोन यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याने सध्या चांगलाच धुमाकुळ घातलेला आहे. या गाण्यात दिपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातल्याने काही लोकांकडून त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. तर अभिनेते प्रकाश राज यांनी याचे समर्थन करत …
Read More »कृषीमंत्री सत्तार म्हणाले, १ ते ५ जानेवारी दरम्यान सिल्लोडला कृषी महोत्सव महोत्सवात कृषी विद्यापीठे, विविध शासकीय विभागांसह विविध यंत्रणांचे ६०० स्टॉल्स
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत १ जानेवारी ते ५ जानेवारी, २०२३ या कालावधीत सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव -२०२३ चे आयोजन केले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी केलेले …
Read More »सोमय्या पिता-पुत्राच्या क्लीनचिटनंतर संजय राऊत म्हणाले, हिशोब केला जाईल.. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिली माहिती
भारतीय नौदलाची युध्दनौका आयएनएस विक्रांत सैन्यदलातून निवृत्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी विक्रांत खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर करण्यासाठी मुंबईत निधी गोळा केला. या निधीप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला. मात्र निधी अपहार प्रकरणी सोमय्यांच्या विरोधात कोणतेही …
Read More »
Marathi e-Batmya