राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा कायदा विधीमंडळाने मंजूर केला आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनीही या कायद्यावर सही केल्याने कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक तारखांचा खेळ थांबवला असून, स्थानिक …
Read More »नाना पटोलेंचा आरोपः नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न …
Read More »अरविंद सावंतांचा सवाल, निवडणूक आयोग बंद असताना त्या बातम्या कशा आल्या?
मागील तीन-चार दिवस दिवाळीची सुट्टी असताना सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ८.५० लाख प्रतिज्ञापत्रे फॉलमेटनुसार नसल्याने रद्द झाल्याचे वृत्त प्रसारीत झाले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात सर्वच प्रसारमाध्यमांना …
Read More »न्यायालयाचा निर्णयः पत्नीला घरातील कामे करायला सांगणे म्हणजे क्रुरपणा नव्हे
जर विवाहीत स्त्रीला अर्थात पत्नीला कुटुंबियासाठी घरातील कामे करायला सांगितले तर तो क्रुरपणा नव्हे तसेच काम सांगण्या मागचा उद्देश हा घरकाम करणाऱ्या मोलकरणीशी होऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमुर्ती विभा कांकणवाडी आणि राजेश एस.पाटील या द्विसदस्यीय खंडपीठाने सारंग दिवाकर आमले विरूध्द …
Read More »ऐन दिवाळीत ठाकरे गटाचे किर्तीकर आणि शिंदे गटाच्या कदम यांची भेट
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जण बाहेर पडले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वत: ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ऐन दिवाळीची धामधुम …
Read More »कर्नाटकातील ‘त्या’ साधूची आत्महत्या हनी ट्रॅपमुळे
काही वर्षांपूर्वी इंदौरचे अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज हे ही एका हमी ट्रॅपमध्ये आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची बाब कालांतराने उघडकीस आली. त्यानंतर अगदी तशीच घटना कर्नाटकात घडल्याचे सांगण्यात येत असून ४५ वर्षीय लिंगायत साधू बसवलिंगा स्वामी यांनी ही याच प्रकारातून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आले आहे. कर्नाटकमधील ४५ वर्षीय लिंगायत साधू …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, थांबलेलं चक्र वेगानं फिरू लागलं पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा
शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पुर्ण करण्यासाठी आम्ही एकजूटीनं प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या मनातलं हे आपलं सरकार आहे. त्यानुसार आमची वाटचाल सुरू असल्याचे सांगत आता सगळ्याच क्षेत्रांत, आघाड्यांवर विकास कामांचा धडाका सुरू आहे. कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक …
Read More »कौशल्य विद्यापीठाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटीचे शिक्षण
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर २०२२ पासून यांची सुरुवात होणार आहे. विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »‘तो’ बॅनर आणि मुख्यमंत्री पदावरून रोहित पवार, निलेश लंकेचे सूचक वक्तव्य
बारामतीत आज बुधवारी दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे भेटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाचे औचित्य साधत संपूर्ण पवार कुटुंबिय कार्यकर्त्ये, सर्वसामान्य नागरीकांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करतात आणि शुभेच्छाही देतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका कार्यकर्त्याने महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार असे लिहिलेले बॅनर कार्यक्रमस्थळी फडकाविले. या …
Read More »केजरीवाल आणि भाजपाच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची टीका, आधी रूपया सांभाळा
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. तसेच तब्बल दोन वर्षानंतर कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. मात्र राजकिय क्षेत्रात कधी कधी बेताल वक्तव्ये करून खळबळ माजवून देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केंद्राकडे मागणी केली. तसेच नोटांवर महात्मा …
Read More »
Marathi e-Batmya