Editor

शिवसेना आक्रमक तर एकनाथ शिंदे गटाला हादरा विधानसभेकडून १६ जणांना नोटीस

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील १६ बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना आपात्र का ठरविण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस आज गुवाहाटीस्थित आमदारांना बजावली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या …

Read More »

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मंजूर केले ‘हे’ पाच ठराव शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून माझ्यावर काकणभर जास्त प्रेम

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड क्षमविण्यासाठी अपयश आल्यानंतर आता शिवसेनेतील आणखी होवू पाहणारी पडझड रोखण्यासाठी तातडीने राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत महत्वाचे पाच ठराव मंजूर करण्यात आले आहे. या बैठकीत प्रामुख्याने शिवसेना हे नाव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पक्षाशिवाय इतरांना वापर करण्यास मज्जाव …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप; ED, CBI, इन्कम टॅक्स या सहका-यांच्या मदतीने मविआ…. ज्या शिवसेनेचे बोट धरून राज्यात वाढले त्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव

ज्या शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात भाजपा वाढली त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवून केंद्रातील मोदी सरकार कारभार करत असून ED, CBI, इन्कम टॅक्स या सहका-यांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. या संदर्भात बोलताना …

Read More »

बंडखोर शिवसेना आमदार जाधव म्हणाल्या, ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या कोणत्याही नेत्यांनी… काहीतरी त्यामागे कारण असेल, ते शोधणं गरजेचं

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या विरोधात आता शिवसेनेनेही तितकेच जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आजपर्यंत जवळपास सतरा आमदारांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आज सादर करण्यात आला. शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे मागील चार दिवसापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिक देखील …

Read More »

संजय राऊत यांचे आव्हान; एकनाथ शिंदेंची वेळ संपली, आता आमची वेळ सुरू महाविकास आघाडीचे सरकार मजबूत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर हे बंड क्षमविण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना परतण्याचे आवाहन केले. मात्र बंडखोर आमदारांकडून परतीच्या अनुषंगाने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ संपली …

Read More »

अस्थिर वातावरणातही मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक दिले ‘हे’ निर्देश राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या …

Read More »

अजित पवार म्हणाले, आता काय लिहून देऊ ? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या …

Read More »

चाकरमान्यांनो गणपतीसाठी कोकणात जाताय, तर एसटीपण आहे बरं का गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या-परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा दि. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २ हजार ५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा निर्धार, माझ्यावर दबाव असला तरी मातोश्रीवर आरोप करणाऱ्यांबरोबर बसणार नाही मी शांत आहे षंड नाही...

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर अनेक आमदार हे शिंदे गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाची पारडे जड होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विभाग प्रमुखांशी आज ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना उध्दव …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी खुषखबरः १०० टक्के पाठ्यक्रम लागू कोरोना कालावधी संपुष्टात आल्यानंतर शिक्षण विभागाचा निर्णय

मागील दोन वर्षात कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये पुरेशा क्षमतेने सुरु नव्हती. तसेच कोरोनामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवाला एकप्रकारे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात येते. परंतु या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला …

Read More »