Editor

ओबीसी समर्पित आयोगातही निर्माण झाले मतभेद राष्ट्रवादी अन शिवसेनेत ओबीसी आरक्षण प्रश्नी उडत आहेत खटके

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे (इतर मागासवर्ग) २७ टक्के आरक्षण पुन:प्राप्त करण्याची राज्य सरकारची लगीनघाई चालु असताना जयंतकुमार बांठिया अध्यक्ष असलेल्या समर्पित आयोगात दुफळी पडली आहे. ओबीसींच्या एम्पिरिकल डेटाचा अहवाल केव्हा सादर करायचा याप्रश्नी आयोगाच्या सदस्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. परिणामी, जूनच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर होण्याची शक्यता मावळली आहे. …

Read More »

आर्यन खानप्रकरणी समीर वानखेडेंची केंद्रीय गृहखात्याकडून चौकशी कॉर्डिलिया क्रुजप्रकरणी मोठा निर्णय

कॉर्डिलीया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला क्लिन चिट देण्यात आली. त्याच्या विरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. या प्रकरणात काही त्रुटी आढळून आल्याची कबुली अमली पदार्थ विरोधी विभागाने दिली आहे. त्यानंतर आता एनसीबी मुंबईचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर …

Read More »

किरिट सोमय्या म्हणाले; परबांनी ती जागा विकली, पण उध्दव ठाकरेंना नोबेल पारितोषिक मिळेल ईडी कारवाईनंतर सोमय्यांची पुन्हा मुख्यमंत्री आणि अनिल परबांवर टीका

ईडीने काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी आणि खासजी निवासस्थानासह ७ ठिकाणी धाडी टाकत १२ तासाहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. तसेच चौकशीला आपण सामोरे जाणार असल्याचेही जाहिर केले. त्यानंतर आज भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज …

Read More »

कॉर्डिलिया क्रुजप्रकरणी एनसीबीची मोठी कबुलीः आर्यन खानसह त्यांच्या विरोधात पुरावा नाही व्हॉट्सअॅप चॅट पुरावा होवू शकत नाही

बॉलीवूड बादशाह शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून वादग्रस्त एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांने गुन्हा नोंदवित कारवाई केली. तसेच याप्रकरणी आर्यन खान हा आठवड्यापेक्षा जास्त कालावधी तुरूंगात रहावे लागले. मात्र याप्रकरणी आता आर्यन खान प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याची स्पष्टोक्ती एनसीबीचे प्रमुख …

Read More »

संभाजी राजेंचा आरोप; मी गेलो पण, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही… राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याचे केले जाहिर

राज्यसभा निवडणूकीतील सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे यांनी प्रयत्न सुरु केले. तसेच अपक्ष उमेदवारी जाहिर करत शिवसेना आणि भाजपाने पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शिवसेनेनेत प्रवेश न केल्यामुळे शिवसेनेने संभाजी राजे यांच्या नावाचा पत्ता कट केला. यासर्व राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर …

Read More »

राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल आता सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी/नुतनीकरण ऑनलाईन होणार

प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी)च्या ऑनलाईन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नुतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालतील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. मुंबईतील कुपरेज येथे स्थित महाराष्ट्र राज्य नाविन्‍यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, कोरोना वाढतोय, मास्क वापरा; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय सारथी संस्थेस खारघरमध्ये भुखंड उपलब्ध करुन देणार

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर …

Read More »

अनिल परब म्हणाले, जे रिसॉर्ट माझे नाही त्यावरून ईडीच्या धाडी, न्यायालयात जाणार ईडीचे अधिकारी गेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती

दापोली येथील कथित रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणांवर छापे मारी केली. जवळपास १२ तासाहून अधिक काळ ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्याकडील सर्व कागदपत्रांची आणि चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, दापोलीतील जे रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टची मालकी …

Read More »

नाना पटोलेंची टीका, नरेंद्र मोदी सरकारचा पायाच खोटेपणावर उभारलेला मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कारभारामुळे देश ५० वर्षे मागे गेला : नाना पटोले

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची मागील ८ वर्षांतील कामगिरी सर्वच आघाडीवर शून्य राहिली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, जनतेसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे, बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली, अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. तर मागील ८ वर्ष ही खाजगीकरणातून मोदींचे उद्योगपती मित्र मात्र मालामाल आणि जनतेचे …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा इशारा, आम्ही पण खूप काही बोलू शकतो… महाराष्ट्राची संस्कृती ती नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले असून महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जनता दरबारानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य त्यांच्या …

Read More »