मागील काही दिवसांपासून संबध देशभरातच मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचे प्रकार सुरु आहेत. राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तर देशात १९ ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र नुकतेच भाजपाच्या एका माजी नगरसेविकेच्या पतीने एका ज्येष्ठ नागरीकांस मुस्लिम असल्याच्या संशयावरून मारहाण केली. या मारहाणीत सदर व्यक्तीचा मृत्यूही झाला. …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंची अशीही संवेदनशीलता, अपघातातील मृतकांना मदत जाहिर नऊ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाची मदत
काल मध्यरात्री चंद्रपूर येथे डिझेल टँकर आणि लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक लागून अपघात झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत नऊ मजूरांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजूरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहिर केली. हा अपघात चंद्रपूर-मूल महामार्गावरील अजयपूर …
Read More »विशेष न्यायालयाचे मलिकांवरील आरोपांबाबत निरिक्षण अन् फडणवीसांचा मविआला टोला म्हणे इतकी धडपड ओबीसी आरक्षणासाठी केली असती तर…
सध्या ईडीच्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मविआमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर नुकतेच आरोप पत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्रात करण्यात आलेल्या आरोपांबाबत तथ्य असल्याचे असल्याचे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी नोंदविल्यानंतर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत खोचक टोलाही लगावला आहे. ही …
Read More »बंजारा व भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्यांप्रश्नी मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक बंजारा व भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ: नाना पटोले
राज्यातील बंजारा समाज व भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या समाज घटकाला न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस नेहमीच वंचित, पीडित, दलित, मागासवर्गांच्या हिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. बंजारा व भटक्या विमुक्त समाजाच्या समस्यांसदर्भात संबंधित विभागाचे मंत्री यांच्याबरोबर लवकरच एक बैठक घेऊ व हे प्रश्न मार्गी …
Read More »अखेर “त्या” चित्रिकरणाबद्दल वैष्णवी पाटीलचा माफीनामा व्हिडिओ शेअर करत माफी मागितली
राजमाता जिजाऊ आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवत पुणे शहर वसविले त्या पुण्यातील ऐतिहासिक अशा लाल महालात चित्रपटातील लावणी नृत्य असलेल्या गाण्याचे चित्रिकरण केल्याप्रकरणावरून सर्वचस्तरातून टीकेची झोड उठत आहे. यापार्श्वभूमीवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर करणारी आणि नृत्यांगणा तथा अभिनेत्री वैष्णवी पाटील हिने व्हिडिओ शेअर करत त्या …
Read More »अॅड. आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच देशाची चौकट मोडण्याचा प्रयत्न करतय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रियेवरून वंचितचा गंभीर आरोप
घटनात्मक चौकट तोडण्याची प्रकिया जी केंद्र शासनापासून सुरु झालेली आहे, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने भर घालू नये ही आमची अपेक्षा आहे. राज्य सरकारला थेट भरती करण्याचा अधिकार नसून ते आज सुरु आहे. अशा गंभीर प्रश्नांवर भर देण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने या देशाची चौकट कशी मोडेल असाच प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक वक्तव्य वंचित …
Read More »लाल महालात लावणीचे चित्रिकरण, अभिनेत्री वैष्णवी पाटीलसह ४ जणांवर गुन्हा फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मिता म्हणून पुण्यातील लाल महालाकडे पाहिले जाते. मात्र लाल महाल बंद असताना महालाचे रिल्स काढायचे असल्याचे सांगत एका चित्रपटाच्या लावणीच्या नृत्याचे चित्रिकरण करून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारीत केल्याप्रकरणी लावणी गाण्यावर नृत्य करणारी नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चार जणांच्या विरोधात शिवप्रेमी संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर …
Read More »संजय निरूपम म्हणाले, माफी मागायला लावली म्हणून… लाऊडस्पीकरच्या माध्यमातून हिंदूत्वाचा मुद्दा आणला
उत्तर प्रदेशातून वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नियोजित पाच जूनचा अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच माफी मागायला लावली म्हणून राज ठाकरे हिंदूत्वाचा मुद्दा सोडून देणार की काय य़ाची मला भीती वाटत असल्याचेही संजय निरूपम म्हणाले. प्रसारमाध्यमांच्या …
Read More »मोदींनी दिला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना २५ वर्षाचा रोडमॅप लोकांसाठी काम करण्याचं देखील केले आवाहन
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मंदिर विरूध्द मस्जिद असा संघर्ष सुरु झालेला असताना तर दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रात भोंगे, हनुमान चालीसा, नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना राष्ट्रीय स्तरावर गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तयारी सुरु केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये या वर्षाअखेरीस …
Read More »सभेआधीच राज ठाकरेंना धक्का, पुण्यातील मनसे कार्यकर्त्ये लवकरच शिवसेनेत पुण्यातील सभे आधीच मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह मराठवाडा येथील कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. तर पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या नेमकी विरूध्द भूमिका घेतली. त्यामुळे पुण्यातील मनसैनिक नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच काही …
Read More »
Marathi e-Batmya