Editor

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्य उत्पादनात ३९ टक्के वाढ, शेत मालाला हमखास भाव पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको - भुसे

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म …

Read More »

चुरस वाढली, संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली सहाव्या जागेवरून होणार रस्सीखेच

माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय अगोदरच जाहिर केला. त्यानंतर शिवसेनेचा एकच खासदार निवडूण जाणार असताना आणि शिल्लक राहीलेल्या मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार उभा कऱण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना राज्यसभेची निवडणूक लढवायची …

Read More »

संभाजी राजेंच्या पाठिंब्याबाबत फडणवीस म्हणाले, याचा निर्णय… राष्ट्रपती नियुक्तीचा निर्णय केंद्रीयस्तरावर निर्णय घेतला

राज्यसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातून एकूण ६ जागा निवडूण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या ६ व्या जागेसाठी राष्ट्रपती नियुक्ती माजी खासदार संभाजी राजे यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिबा देण्याचे सुतोवाच केले असताना भाजपाकडून काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले असतानाच यासंदर्भात राज्यातील …

Read More »

राज्यपाल भेटले की म्हणतात, अजितजी… क्यूं फिकर करते हो १२ आमदारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी दिली माहिती

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांना पाठवून दिलेल्या घटनेस अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी राज्यपालांनी अद्याप मंजूर केली नाही यावरून आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोनवेळा पत्रही पाठविले. तसेच याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून टीपण्णीही करण्यात आली. मात्र याप्रश्नावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी …

Read More »

अखेर ठरलं पुण्यातली अयोध्येपूर्वीची ‘राज गर्जना’ रविवारी सकाळी होणार २२ तारखेला सभागृहात सभेचे आयोजन

नियोजित अयोध्या दौऱ्यापूर्वी पुणे येथे जाहिर सभा घेण्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली. मात्र सध्या पुणे दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या कामासाठी पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतले. त्यामुळे मनसेची २१ मेची सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येवू लागले. परंतु काही वेळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज …

Read More »

अखेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरीला अटकपूर्व जामीन, पण “या” अटींवर सत्र न्यायालयाने दिला जामीन

भोंग्याच्या प्रश्नावरून मुंबई पोलिसांनी मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीसा आणि धरपकड करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर अटकेची कारवाई करताना देशपांडे हे पोलिसांच्या हातातून निसटून त्यांच्याच गाडीत बसून पळून गेले. त्यानंतर जवळपास तीन आठवड्यांपासून ते ‘नॉट …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवार म्हणाले, जूनमध्ये मांडणार मध्य प्रदेश सरकारच्या याचिकेवरील निर्णयावर बोलताना स्पष्ट केले

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे राज्यातही आम्ही लगेच प्रयत्न सुरू केले आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे त्यांचेही काम सुरू आहे. मध्य प्रदेश राज्य जसं सर्वोच्च न्यायालयात गेले त्याचधर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आमचं म्हणणं मांडणार आहोत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत …

Read More »

बीडीडी चाळीतील पोलीसांना बांधकाम दराने मिळणार घरे पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नायगाव, एन एम जोशी आणि वरळी येथील बिडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन २०११ च्या आधिपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात असलेल्या पोलीसांच्या कुटुंबियांना बांधकाम दराने ही घरे देता यावीत यासाठी गृहनिर्माण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी , …

Read More »

महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल; विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी …

Read More »

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी समिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

शहरातील विकासकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी सांगितलेल्या अनेक समस्यांचे निराकरण …

Read More »