Editor

भाजपाच्या टीकेवर छद्मी हसून पवारांनी दिले उत्तर राज्याचे निर्णय मुख्यमंत्रीच घेतात

मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी मदत केली. त्यावरून भाजपाने शरद पवार हे कोणत्याही संविधानिक पदावर नसताना बैठका कशा घेतात अशी टीका करत पवार हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिलाय का? अशी खोचक टीका केली. यासंदर्भात राष्ट्रवादी …

Read More »

उत्तर प्रदेश, पंजाबबाबत पवारांचे भाकित तर पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून व्यक्त केले “हे” मत गोव्यात मविआचा प्रयोग तर मणिपूरमध्ये ५ जागा लढविणार

मराठी ई-बातम्या टीम देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणकोणत्या राज्यात निवडणूका लढविणार आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील निवडणूकाबाबत भाकित केले …

Read More »

व्होडाफोन-आयडीयाचे आता केंद्र सरकारबरोबर Together For Tomorrow थकीत रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या बदल्यात भागीदारी

मराठी ई-बातम्या टीम एकाबाजूला भाग भांडवल उभारण्यासाठी आणि महसूली तूट भरून काढण्यासाठी सरकारी मालकीच्या कंपन्या विकण्याचे धोरण केंद्र सरकारने स्विकारले असताना दुसऱ्याबाजूला मात्र व्होडाफोन आयडिया या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीकडून सरकारला मिळणाऱ्या थकबाकी पोटी थेट भागीदारीच स्विकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. व्होजाफोन आयडीया कंपनीकडे स्पेक्ट्रम खरेदीतील थकबाकी आणि त्यावरील व्याजाची …

Read More »

म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे विक्रमी गुंतवणूक डिसेंबरमध्ये १२ लाख नवीन खाती

मराठी ई-बातम्या टीम म्युच्युअल फंड उद्योगाला सध्या चांगले दिवस येत आहेत. गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय म्हणून याकडे बघितले जात आहे.  या क्षेत्रात येणारी गुंतवणूक याची पुष्टी करत आहे. गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक ११,३०५ कोटी रुपयांची झाली आहे. म्युच्युअल …

Read More »

कोरोना चाचणीबाबत आयसीएमआरने जारी केल्या या नव्या गाईडलाईन्स चाचणी कोणी आणि कधी करावी याबाबत स्पष्ट सूचना

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर कोणत्या नागरीकांनी चाचणी करावी, कोणी करू नये आणि कोणती चाचणी करावी या अनुषंगाने आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च संस्थेने सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत. कोविड आणि ओमायक्रॉनची …

Read More »

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे खणन पूर्ण: जाणून घ्या बोगद्याची माहिती दुसऱ्या बोगद्याचे काम एप्रिल २०२२ पासून सुरु होणार

मराठी ई-बातम्या टीम महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अधिपत्याखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे काम वेगाने सुरु आहे. प्रकल्‍पाचे जवळपास ५० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्‍प डिसेंबर, २०२३ मध्‍ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय …

Read More »

बँक कर्मचारी पुन्हा संपावर : या दिवशी करणार संप २३,२४ फेब्रुवारीला संपावर

मराठी ई-बातम्या टीम बँक कर्मचारी २३ आणि २४ फेब्रुवारीला पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. सेंट्रल ट्रेड युनियन्स (CTU) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (AIBEA) सह इतर संघटनांनी संयुक्तपणे बँक संपाची घोषणा केली आहे. देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी …

Read More »

९ दिवसानंतर कोरोना बाधितांची संख्येत घट: पण मुंबईसह उपनगरात संख्या चढीच मुंबईसह उपनगरात २३ हजार तर ओमायक्रॉन ३१

मराठी ई-बातम्या टीम जवळपास डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वाढीला लागलेली कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढ काल स्थिरावल्यानंतर आज त्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही मुंबईसह उपनगरात जवळपास २३ हजार संख्या आढळून आलेली आहे. तर राज्यात ३३ हजार ४७० रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज १३ हजार ६४८ आणि …

Read More »

वर्षा गायकवाड यांची घोषणा, थांबलेले शिक्षण पुन्हा सुरु होणार : परिक्षा नियोजित वेळेतच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार

 मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारी पर्यत राज्यातील पहिली ते १२ वी पर्यतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत शाळांच्या विद्यार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या …

Read More »

निलंबनाची सुनावणी सभागृह सुरु नसताना करुन काय उपयोग? भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांचा सवाल

मराठी ई-बातम्या टीम निलंबन प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांच्या सुनावणीला आम्ही आज ६ आमदार १२ आमदारांच्यावतीने उपस्थिती राहिलो. आमचे निवेदन लेखी स्वरुपात आम्ही दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सदर निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग, हेही आम्ही उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार …

Read More »