मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे नुकतेच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना थोडीसे प्रकृत्ती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तपासणी असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच त्यांचे पती सदानंद सुळे यांचीही तपासणी …
Read More »नववर्ष स्वागताचे नियोजन करताय? मग गृह विभागाची नियमावली वाचाच ३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मराठी ई-बातम्या टीम कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना …
Read More »त्या दिवशी विधान परिषदेत काय घडले? उपसभापती कार्यालयाने दिला घटनाक्रम विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाने दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम बोलण्याची संधी नाकारल्याच्या कारणावरून विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला आहे. मात्र त्या दिवशी अर्थात काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधीच्या वेळी नेमके काय झाले याची माहिती उप सभापती कार्यालयाने जाहिर केली आहे. ती माहिती खालील प्रमाणे …
Read More »अध्यक्ष निवडणूकीसाठी विधानसभा नियम समितीने नेमके कोणते केले बदल समितीने सुचविलेल्या नियमातील बदलास विधानसभेत मिळाली मंजूरी
मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूक नियमावलीतील दुरूस्तीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये विधानसभेत वाद-विवादाच्या फैरी झाल्या. त्यानंतर आता राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये त्यातील बदलावरून संघर्ष निर्माण झाला असून राज्यपालांनी विधानसभेने संमत केलेल्या नियमातील दुरूस्तीवरच आक्षेप घेत अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला परवानगी नाकारली. त्यामुळे विधानसभा नियम …
Read More »१ जानेवारीपासून होणार ‘हे’ ६ बदल, जाणून घ्या… मुलांचे लसीकरण, एटीएममधून पैसे काढणे, कपडे-पादत्राणे खरेदी, ऑनलाईन बुकिंग यासह ६ गोष्टीं महागणार
मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्ष म्हणजे २०२२ आपल्यासोबत अनेक बदल घेऊन येणार आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावरही परिणाम होईल. १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे आणि कपडे आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होणार आहे. १ जानेवारीपासून होणार्या ६ बदलांबद्दल आपण जाणून घेऊया. 1. ATM मधून पैसे काढणे महागणार आरबीआयने मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे. 2. कपडे आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होईल कपडे आणि पादत्राणांवर १ जानेवारीपासून १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. भारत सरकारने कापड, रेडिमेड आणि फुटवेअरवरील GST ७ टक्क्याने वाढवला आहे. याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिक्षा बुकिंगवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच ओला, उबेर यांसारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटो रिक्षा बुक करणे आता महाग होणार आहे. मात्र, ऑफलाइन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. तो कराच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. 3. मुलांना कोरोनाची लस देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी १० वी वर्ग ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. 4. पोस्ट पेमेंट बँकेने वाढवले शुल्क इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खातेधारकांना १ जानेवारीपासून रोख रक्कम काढणे आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवींसाठी शुल्क भरावे लागेल. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर ०.५० टक्के शुल्क भरावे लागेल जे किमान २५ रुपये असेल. मात्र, बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बेसिक सेव्हिंग अकाऊंट व्यतिरिक्त बचत खाते आणि चालू खात्यात १०,००० रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १० हजार नंतर ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल. जे प्रति व्यवहार किमान २५ रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये दरमहा २५,००० रुपयांपर्यंत रोख काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ०.२५ टक्के शुल्क आकारले जाईल. 5. अॅमेझॉन प्राइमवर क्रिकेट सामने Amazon च्या OTT प्लॅटफॉर्मवर आता प्राइम व्हिडिओवर लाइव्ह क्रिकेट सामने पाहता येणार आहेत. Amazon प्राइम व्हिडिओ पुढील वर्षी १ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसह थेट क्रिकेट स्ट्रीमिंग खेळात प्रवेश करत आहे. 6. कार महागार नवीन वर्षात तुम्हाला मारुती सुझुकी, रेनॉल्ट, होंडा, टोयोटा आणि स्कोडा यासह जवळपास सर्वच कार कंपन्यांच्या कार खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. टाटा मोटर्स १ जानेवारी पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५ टक्के वाढवणार आहे. Share on: WhatsApp
Read More »महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये आता शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने विधेयक मंजूर
मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शैक्षणिक संस्थातील महाविद्यालय, विद्यापीठांत आता शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू होणार आहे. याबाबतचे विधेयक मंगळवारी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले. यानंतर सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेनंतर विधान परिषदेतही या विधेयकला मंजुरी देण्यात आली. सध्या राज्यातील शैक्षणिक संस्थामधील …
Read More »विद्यापीठ विधेयकातील “या” तरतूदींवरून मुनगंटीवारांचा सरकारला सवाल मंडळावरील सदस्यांच्या त्या गोष्टी कोण तपासणार?
मराठी ई-बातम्या टीम विधानसभेत संध्याकाळी सार्वजनिक विद्यापीठ दुरूस्ती विधेयक मान्यतेसाठी आल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना चांगलेच धारेवर धरत या दुरूस्ती विधेयकातील त्या तरतूदींनुसार नियुक्त करण्यात येणार असलेल्या व्यक्तींची तपासणी कशी करणार असा सवाल यावेळी उपस्थित केला. सार्वजनिक विद्यापीठ दुरूस्ती विधेयक मांडल्यानंतर त्यावरील …
Read More »नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी
मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी पोलिसांकडून होणाऱ्या संभावित अटकेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र आज त्यावर न्यायालयाकडून अंतिम निर्णय न दिल्याने याप्रकरणी उद्या पुन्हा सुणावनी होणार आहे. त्यावेळीच …
Read More »विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता
मराठी ई-बातम्या टीम अधिवेशन काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात ट्विटर युध्द झाले. तसेच राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून मांजराचा आवास काढला. याशिवाय विधानसभा कामकाजाच्यावेळी भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने विधानसभेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे …
Read More »अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावाः नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला. गांधी भवन येथे …
Read More »
Marathi e-Batmya