Editor

हरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात कमावती व्यक्ती गेलेल्यांनी या संस्थेच्या फोनवर संपर्क साधा

अहमदनगर: प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  घरातील कमावता हात गमावलेल्यांचे अक्षरशः आभाळ हरवले. तथापी मुंबई येथील स्व. विश्वनाथराव बिरेवार फाउंडेशन ट्रस्ट अशा परीवारांचा अनामप्रेम संस्थेच्या माध्यमातून सोबती बनला आहे. तूर्त तातडीचा आर्थिक सहयोग बिरेवार फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून दिला जात आहे. तथापि अशा परीवारांत नवा कमावता हात निर्माण होईपर्यंत त्यांची सोबत करण्याचा निर्धार अनामप्रेम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी …

Read More »

लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नसल्याने राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का, असा सवाल प्रदेश भाजपाचे …

Read More »

केंद्रामुळे महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या बर्‍याच कंपन्यांनी थेट राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. मात्र देशाची एक पॉलिसी ठरवावी आणि लसीची अंमलबजावणी करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. त्यामुळे आतातरी केंद्राने एक राष्ट्रीय पॉलिसी तयार करून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण: न्यायालयाने दिली सरकारला दोन आठवड्यांची मुदत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याप्रश्नी राज्य सरकारने ७ मे आणि १० मे रोजी शासन निर्णय प्रसिध्द करत रिक्त असलेल्या पदोन्नतीतील जागा सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या याच निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशनद्वारे आव्हान देण्यात आल्याने यासंदर्भात दोन आठवड्यात उत्तर द्यावे असे आदेश …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण प्रश्नी काँग्रेस आक्रमक: विश्वासात न घेता निर्णय घेतला ७ मे चा जीआर रद्द करायला भाग पाडूः नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे या मुद्यावर काँग्रेस पक्ष ठाम असून या प्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मे चा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू, अशी ग्वाही आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.   पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी …

Read More »

अजित पवारांचे आदेश “त्या” १३१ रूग्णालयांची यादी जाहिर करा कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देताना कोरोनासंसर्गीताच्या संपर्कात असणाऱ्या हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या कोराना चाचणीवर भर द्यावा. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द करावी. कोरोना लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के …

Read More »

प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान मोदींना छत्रपतींची आठवण केवळ मतांकरिताच होते का?- सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली, परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता …

Read More »

#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी १५ मे  ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने १३ एप्रिल …

Read More »

आंतरराष्ट्रीय बाजारातून म्युकरमायकोसीसवरील ६० हजार इंजेक्शन्स होणार उपलब्ध आशा कार्यकर्तींना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीयस्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात …

Read More »

वाघांसाठी दोन गावांचे पुर्नवसन करा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी अलीकडील काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात सध्या ३१२ वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा  व्याघ्र प्रकल्पाच्या आतील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील पण वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे …

Read More »