Editor

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभारा बाबत कदाचित अनभिद्न्य आहेत, केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत , शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तनाबूत करणाऱ्या रानडुकरासारखे हे केंद्र सरकार काम करत असून गडकरी …

Read More »

कोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट ३ हजार ८३७ नवे बाधित, ४ हजार १९६ बरे झाले तर ८० जणांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील चार दिवसांपासून राज्यात पाच हजारापार तर मुंबई हजारापार आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येत आज घट झाली आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार ८३७ इतके नवे बाधित बाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत ६४६ इतके रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या १८ लाख २३ हजार ८९६ तर …

Read More »

धर्माचा चष्मा लावणाऱ्यानों, गीता पठण स्पर्धेतही मुस्लिम मुलगी प्रथम आलेली होती देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही-नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला असून या आक्षेपाला नवाब मलिक …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंना विसर पडतोय महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा अण्णाभाऊ साठेंनंतर महात्मा फुलेंचा विसर

मुंबई : प्रतिनिधी देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक पुरोगामी राज्य असल्याचे आतापर्यत सर्वच नेत्यांनी सांगत त्याविषयीच्या परंपरेत खंड पडू दिला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराजांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून सांगितला जातो. मात्र दोनच दिवसापूर्वी अर्थात २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले …

Read More »

स्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या विषाचं इंजेक्शन घेतल्याची चर्चा

चंद्रपूर : चंद्रपूर ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी केली आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल आमटे या सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ.विकास आमटे …

Read More »

केवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

पुणे : प्रतिनिधी राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने गेले वर्षभर केवळ सत्ता टिकविण्यासाठी धडपड केली. पूर्णपणे अपयशी ठरलेल्या या सरकारमुळे राज्यातील सर्वसामान्य माणूस भरडला गेला, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुणे येथे केली. महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षातील अपयशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

कोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल ५ हजार ५४४ नवे बाधित, ४ हजार ३६२ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दररोज ७० ते ८० हजार तपासण्या होत असल्या तरी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र ही संख्या नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी दररोज आढळून येणाऱ्या संख्येने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येने पुन्हा एकदा एक लाख संख्येकडे वाटचाल सुरु केली आहे. मागील २४ तासात राज्यात ५ हजार ५४४ नवे बाधित …

Read More »

रेल्वेचा अजब कारभार : निवड झालेल्या राज्यातील ५६५ जणांना नोकरीवरच घेईना १ डिसेंबर रोजी सीएसएमटीला आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करत नोकर भरतीच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या. मात्र या प्रक्रियेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ५६५ उमेदवारांना वर्ष होत आले तरी अद्याप नोकरीवर रूजूच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून लवकरात लवकर …

Read More »

मराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका

सातारा : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकविण्यात सध्याचे राज्य सरकार अपयशी ठरल्याने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो असे आवाहन भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे यांनी करत ती मोठी माणसे आहेत, ते मराठा स्ट्राँगमॅन म्हणून ओळखली जातात त्यांच्याकडून मराठा समाजाला न्याय मिळणार नसल्याचे …

Read More »

मंत्रालयातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती मिळणे होणार बंद सामान्य प्रशासन विभाग बनवतंय नवे धोरण

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनात “मलाईदार प्रतिनियुक्ती” वर असलेल्या पदांची अनेकांना भुरळ पडली आहे. त्यात महसूल विभाग अग्रेसर असला तरी इतर विभागातही त्याची थोड्या फार प्रमाणात लागण झालेली आहे. त्यामुळे विशेषत: मंत्रालयीन केडरच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या बाहेरील पदांवर प्रतिनियुक्तीवर जाणे आता बंद करण्यात येणार असून त्याविषयीचे नवे धोरण सामान्य प्रशासन …

Read More »