Editor

अखेर भाजपाने निर्माण केली नवी सशक्त विरोधी पक्षाची प्रतिमा आव्हान महाविकास आघाडीसमोरील कि फक्त शिवसेनेसमोरील

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील पाच वर्षात राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राज्यात आणि केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज क्षीण राहीला. त्यामुळे अनेकवेळा विरोधक कुठे आहेत? प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात स्व. ग.प्र. प्रधान, स्व.एस.एम.जोशी यांच्यासह स्व.गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ सारख्या विरोधी पक्षनेत्यांची आठवण काढली …

Read More »

माझी चौकशी करा ! फडणवीसांचे सरकारला खुले आव्हान दोनवेळा पुन्हा सभागृहाचे कामकाज तहकूब

मुंबईः प्रतिनिधी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच चौकशी करण्याचे सरकारला आव्हान दिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच पंचाईत झाल्याने अखेर गोंधळातच पुढील कामकाज घेण्याची पाळी महाविकास …

Read More »

हिरेन आणि डेलकर आत्महत्येवरून सेना-भाजपामध्ये रंगला सामना विधानसभेचे कामकाज तहकूब

मुंबई : विशेष प्रतिनिधी ॲटालिया इमारतीच्या जवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालक मनसुख हिरेन आणि दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपाचे सदस्य पहिल्यांदाच आमने-सामने आले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते …

Read More »

केंद्राची स्पष्टोक्ती, आरक्षण कायदा करण्याचा अधिकार राज्यांना नाही मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही राज्यांना आरक्षण कायदा करण्याचा अधिकार नसल्याची स्पष्टोक्ती सॉलिसिटर जनरल के.के.वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिल्याने राज्यातील मराठा समाजाला देण्याविषयीचा राज्य सरकारने केलेला कायदाच बेकायदेशीर ठरला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण आता मिळणार कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »

“त्या” प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याच्या डावामागे केंद्राच काळंबेरं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आरोप

मुंबई प्रतिनिधी ॲटांलिया बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच बोलत “यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच …

Read More »

महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पातून सर्वांचीच निराशा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून समाजाच्या सर्वच घटकांची निराशा झाल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील दोन लाखापेक्षा कमी कर्ज असणारे …

Read More »

राज्याच्या तिजोरीत किती जमा आणि खर्च येणार तर तूट किती? वाचा केंद्राकडून ७० हजार कोटी न दिल्यास तूट वाढू शकते अशी भीती

मुंबईः प्रतिनिधी मागील वर्षात कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच वित्तीय केंद्रे बंद राहिली. त्यामुळे राज्याच्या महसूलात १ लाख कोटी रूपयांची तूट आली. तरीही यंदाच्या वर्षी ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी रूपये अंदाजीत महसूली जमेचे उद्दिष्ट असलेला आणि १० हजार २२५ कोटी तर राजकोषीय ६६ हजार ६४१ कोटी रूपयांच्या तूटीचा  आणि …

Read More »

राज्यातील जनतेसाठी अर्थसंकल्पातून अजित पवार यांनी काय दिले? क्लिक करा संपूर्ण अर्थसंकल्प आपल्यासाठी

मुंबईः प्रतिनिधी अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील पहिला भाग खालील प्रमाणे त्यांच्याच भाषेत…. आज ८ मार्च. हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपणा सर्वांना माहित आहे. त्या निमित्ताने मी सरुवातीलाच राज्यातील सर्व माता-भगिनींना, युवती-विद्यार्थींनीना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो…. शुभ …

Read More »

कोरोना चाचणी केली नसल्याने माजी मुख्यमंत्र्यांसह २५ जणांना प्रवेश नाकारला कॉंग्रेस आमदार अमिन पटेल यांनी उपस्थित केला मुद्दा

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन कालावधीत दोन वेळा कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असताना काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २५ आमदारांनी चाचणीच केली नसल्याने विधिमंडळात प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. जरी आमदारांनी चाचणी केली नसली तरी त्यांना विधिमंडळात प्रवेश द्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमिन पटेल …

Read More »

सांगली आणि जळगांवातील “ती” चे कर्तृत्व जागतिक महिला दिनानिमित्त अर्चना शंभरकर यांनी घेतला राज्यातील महिला उद्योजिकेंचा आढावा

कोरोना सारख्या संकटामुळे अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. यात महिला उद्योजिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाले आहेत. शासनाच्यावतीने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येते. शासनाच्या योजनांचा लाभ घेत महिला उद्योग धोरणातून शंभर उद्योग उभे राहिले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सुमारे साडेतीन हजार महिलांनी फायदा घेतला आहे. १७ समुह प्रकल्प महिला उद्योजकांनी उभे केले …

Read More »