संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हातामध्ये घेतले आहे. आतापर्यंत ३२ पूल महारेलनी पूर्ण केले आहेत, यावर्षी २५ पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचे आहे, त्या दृष्टीने महारेलकडे जबाबदारी दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र शासन आणि रेल्वे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे न्यायमूर्ती भूषण गवई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारंभात न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे 52व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या समारोहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार महाराष्ट्रात ५,१२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक; २७,५१० रोजगाराच्या संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर.के.नारायणन यांच्या स्वाक्षरीत हा करार झाला. यावेळी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश, त्या मुस्लिम मुलाचा शैक्षणिक खर्च करा शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण प्रकरण
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उत्तर प्रदेश (यूपी) सरकारला मुझफ्फरनगरमधील मुस्लिम मुलाच्या शालेय खर्चाची जबाबदारी घेण्याचे निर्देश दिले, ज्याला २०२३ मध्ये त्याच्या वर्गमित्रांनी त्यांच्या शिक्षकांच्या सांगण्यावरून मारहाण केली होती [तुषार गांधी विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि इतर]. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय एस ओक आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, …
Read More »मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची तंबी, भाजपा मंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा… कर्नल सोफिया कुरेशीबाबत मुक्ताफळे उधाळणाऱ्या भाजपा मंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बुधवारी भाजपाचे आदिवासी मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरुद्ध स्वत:हून खटला सुरू केला, ज्यांनी भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांना लक्ष्य करून पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरबाबत मीडियाला माहिती दिली होती. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने पोलीस महासंचालक (डीजीपी) …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले खरीप हंगामासाठी सरकारची तयारी नाही, खते, बि बियाण्यांचा पुरवठा मुबलक ठेवा, बोगस बियाणे, लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करा
राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. …
Read More »राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश, जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे काम गतीने पूर्ण करा रूग्णालयाची पाहणी करून घेतला आढावा
जे.जे रूग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनविण्याच्या कामास गती द्यावी. यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रूग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाज करण्याचे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रुग्णालयाला भेट व पाहणी करुन आढावा बैठक घेतला, …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री नोंदणी थांबवा कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेत घेण्याच्या सूचना
राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. या देवस्थान जमीनींचे खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत. देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकार धोरण ठरवित आहे. तोपर्यंत या जमिनींची दस्त नोंदणी करणे थांबविण्यात यावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्याबरोबरच कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेमध्ये बसवून सर्व्हे करण्यात यावा, असेही …
Read More »पाकिस्तानी हद्दीत चूकून गेलेल्या भारतीय बीएसएफच्या जवानाला सोडले जवानाला सोडल्यानंतर बीएसएफची माहिती
२३ एप्रिल रोजी पंजाब सीमेवर चुकून पाकिस्तानी हद्दीत घुसलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कॉन्स्टेबलला बुधवारी पाकिस्तान रेंजर्सनी परत सोडले. बीएसएफने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सकाळी १०:३० वाजता अटारी-वाघा सीमेवर ही चकमक झाली. पूर्णम कुमार शॉ असे या कॉन्स्टेबलचे नाव असून त्याने ऑपरेशनल ड्युटी दरम्यान फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. …
Read More »केंद्र सरकारची एचसीएल-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजूरी ३ हजार ७०६ कोटी रूपयांचा डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स प्रकल्प उत्तर प्रदेशात उभारण्यास कॅबिनेट बैठकीत मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी (१४ मे २०२५०) झालेल्या बैठकीत एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर संयुक्त उपक्रमाला मंजुरी दिली. तसेच उत्तर प्रदेशातील जेवर येथे अंदाजे ३,७०६ कोटी रुपयांचा डिस्प्ले चिप्स उत्पादन प्रकल्पासही मंजूरी देण्यात आली. प्रस्तावित एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स आणि इतर उपकरणांसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार करेल, असे माहिती आणि …
Read More »
Marathi e-Batmya