Editor

प्रताप सरनाईक यांची ग्वाही, एसटीचा पगार दरमहा ७ तारखेला होण्याची जबाबदारी माझी यावेळी वेतन एकाच महिन्यात दोन वेळा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी घेतली जबाबदारी

यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल! असे नि: संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाने ₹१२० कोटी तातडीने दिले मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यांत उर्वरित वेतन जमा होणार

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नासाठी राजशिष्टाचाराला बगल देत मंत्रालयात वित्त सचिवांचा दालनात बैठक घेऊन वित्त सचिव सौरभ विजय यांच्या कडे एसटी महामंडळाचे विविध सवलती पोटी  शासनाकडे थकीत असलेले ₹ १०७६ कोटी रुपये तातडीने दयावेत अशी आग्रही मागणी केली. यावेळी बोलताना मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अभ्युदय नगर पुनर्विकासात किमान ६२० चौ.फूटाची सदनिका निविदा प्रक्रियेला गती देण्याचे आदेश

मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात व ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रविण दरेकर, अजय चौधरी, माजी आमदार बाळा …

Read More »

राज्यमंत्री अर्जून मेघवाल म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा भाजपाने राखला सन्मान भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळा संपन्न

संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे …

Read More »

वंचित बहुजन आघाडीची सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात निदर्शने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करणार नाही म्हणत घोषणाबाजी

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपटातील काही दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत ती दृष्ट कट करण्याची सूचना केली. त्यातच पुण्यातील काही ब्राम्हण संघटनांनीही फुले चित्रपटात दाखविण्यात आलेल्या दृष्यांच्या विरोधात आक्षेप घेत आंदोलनेही केली. 📍फुले वाडा, पुणे निषेध आंदोलन सेन्सर बोर्डाच्या जातीवादी निर्णयाचा विरोधातील निषेध आंदोलनात वंचित बहुजन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, फुले दाम्पत्य ज्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले समता, बंधुता व सामाजिक न्यायाला बाजूला सारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या भगिनीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. हा रुग्णालयाने घेतलेला बळी आहे. या धर्मादाय रुग्णालयाने अटी व शर्थींचा भंग केलेला आहे पण कारवाई करताना सरकार वेळकाढूपणा करत आहे. मंगेशकर रुग्णालयातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने …

Read More »

थोरियम अणुभट्टी विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार रशियाची रोसातोम आणि महाजेनको मध्ये सामंज्यस करार

थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय कंपनी स्मॉल मॉड्युलर  रिॲक्टर विथ थोरियम फ्युएल यांच्यामध्ये सहकार्य पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्रात थोरियम रिॲक्टरचे संयुक्त विकास करणे, अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) च्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिॲक्टरचे व्यावसायिकीकरण करणे, “मेक इन महाराष्ट्र” उपक्रमांतर्गत थोरियम रिॲक्टरसाठी असेंब्ली लाईनची स्थापना करणे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय आर्थिक बाजू तपासून घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई-ट्रान्सीट सुरू करण्याविषयी हेस-एजी (HESS-AG) कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रकल्पाची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेल्या टीकेवरून खा. सुनिल तटकरे यांची टीका सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या कुटुंबाचा अवमान हे भारतीय संस्कृतीला न शोभणारं

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी केलेले विधान हे अत्यंत क्लेशदायक, निषेधार्ह व लांच्छनास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, “लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबियांनी देशाच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान दिले आहे. मास्टर …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, पुनर्विकासित कामाठीपुराला नामदेव ढसाळ नगर नाव सार काही समष्टीसाठी कार्यक्रमात केली घोषणा

ज्या कामाठी पुरातील व्यथा वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल तेव्हा या भागाला महान कवी नामदेव ढसाळ नगर असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. …

Read More »