तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या सहकारी आतिशी यांची मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचविले. त्यानुसार आतिशी यांचा आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सर्वात तरूण वयात आतिषी यांच्यावर आम आदमी पार्टीने सोपविली …
Read More »केंद्रीय मंत्री सी आर पाटील म्हणाले, देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये 'नाम' फाउंडेशनचा मोठा वाटा
प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी …
Read More »नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती , रस्ते राज्य सरकारकडे आणि शिव्या मी खातो… नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार-
साधारणतः १०-१२ वर्षापूर्वी केंद्राच्या अखत्यारीत असलेले पुणे-मुंबईचे रस्ते राज्य सरकारने मागून घेतले. मात्र या रस्त्याची व्यवस्था राज्य सरकारकडून नीट राखली जात नसल्याने त्या बदल्यात मला शिव्या खावाव्य लागतात अशी स्पष्टोक्ती केंद्रीय रस्त महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देत राज्य सरकारला नोटीस काढायला सांगितल्याचे सांगितले. पुढे बोलताना नितीन गडकरी …
Read More »मंगलप्रभात लोढा यांचा इशारा, धारावीमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई सीसीटीव्ही फुटेज बघुन कारवाई करणार
आज मुंबई महापालिकेद्वारे सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण …
Read More »धारावीत मस्जिदीचे वाढीव बांधकाम पाडण्यावरून तणाव परंतु मस्जिदीच्या ट्रस्टींनी स्वतः वाढीव बांधकाम पाडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शांतता
मागील काही वर्षांमध्ये धारावीतील मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवर अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर पाण्याच्या पाईपलाईन करणाऱ्या जागेवरही येथील अनेकांनी अनधिकृतपणे घरे बांधली. त्याबाबत तेथील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या, इतकेच काय एमआरटीपी कायद्याखाली पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढाकारही घेतला. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारावीतील …
Read More »मराठा-ओबीसी कार्यकर्त्ये एकमेकांच्या आमने-सामनेः पुढील अनर्थ टळला वढगुद्री आणि अंतरावली सराटीतील कार्यकर्त्ये आले समोरासमोर
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरावली सराटी येथे आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु झाले. मात्र अंतरावली सराटी येथे जाण्यासाठी वढगुद्री येथूनच पुढे जावे लागते. नेमक्या वढगुद्री येथे ओबीसी समाजाचे गणेश हाके आणि प्रा. लक्ष्मण वाघमारे यांचेही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको या मागणीवरून आंदोलन सुरु …
Read More »काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान;शेतकऱ्यांना भरीव मदत करावी
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. ही सर्व परिस्थिती राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज काँग्रेसच्या …
Read More »वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जाहिर जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध , युतीचे अधिकृत नावही जाहिर करणार
विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होण्याला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांकडून आघाडी, जागा वाटप आदी प्रश्नांमध्ये व्यस्त आहेत. तसेच एकाही राजकिय पक्षाने किंवा महायुती-आघाडीने अधिकृत जागावाटपाची चर्चा जाहिर केलेली नसताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र विधानसभा निवडणूकीचे उमेदवार जाहिर करण्यात आघाडी घेतली …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारमुळे पालक-विद्यार्थी देशोधडीला लागणार कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा महायुतीचा निर्णय
राज्यातील खाजगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने तात्काळ स्थगित करावा. कारण महायुती सरकारने असंविधानिकपणे, कायद्याची पायमल्ली करुन आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन हा निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आर्थिक …
Read More »जुहू किनाऱ्यावर राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री शिंदे यांची स्वच्छता मोहीम आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. …
Read More »
Marathi e-Batmya