Breaking News

पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, राम मंदिराचे निमंत्रण नाकारून अपमान…

लोकसभा निवडणूकी निमित्त उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे भाजपाच्यावतीने आज ९ एप्रिल रोजी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला भाजपाचे अनेक उमेदवार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दंडाला धरून समोरून जाण्यास सांगितले, त्या घटनेची. …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, काल विचित्र योगायोग होता अमावस्या, सुर्यग्रहण…

लोकसभा निवडणूकीची सुरुवात झाली आहे. महाविकास विकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्रित आलो आहोत. पण निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून पुढे वाटचाल करतो. देशाची राज्यघटना आणि जनतेला असलेले अधिकार अबादीत राखण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. काल जी ही चंद्रपूरात सभा झाली, त्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून टीका …

Read More »

महाविकास आघाडीचं ठरलं, कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाचा उमेदवार

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होवून जवळपास २० ते २५ दिवस झाले. पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच जागांवर निवडणूकीची प्रक्रियाही आता थोड्याच कालावधीत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मविआ अर्थात महाविकास आघाडीने गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख …

Read More »

कर दात्यांसाठी खुशखबर, परतावा सादर करण्याची मुदत वाढविली आता एप्रिल महिन्याच्या या तारखेपर्यंतही दाखल करण्यास दिला वेळ

ज्यांना अद्याप आयकर परतावा मिळाला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रलंबित परतावा मंजूर करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने ३० एप्रिल ही अंतिम मुदत दिली आहे. दरम्यान, १ एप्रिल रोजी मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी पोर्टल उघडल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत ४६,००० हून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे भरली गेली आहेत. त्यापैकी जवळपास ३,००० आधीच प्रक्रिया …

Read More »

अॅक्सिस बँकेतून ही कंपनी बाहेर पडणार नवीन ब्लॉक डिल करण्याच्या विचारात

ॲक्सिस बँकेत मोठ्या धमाकेदार प्रवेशानंतर सहा वर्षांहून अधिक काळ, बेन कॅपिटल खाजगी क्षेत्रातील कर्जदात्यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी सज्ज आहे, कारण यूएस प्रायव्हेट इक्विटी प्रमुख आपला शिल्लक हिस्सा कमी करण्याचा आणि नवीन ब्लॉक डील लाँच करण्याच्या विचारात आहे. सुमारे $४३० दशलक्ष, माहितीत असलेल्या तीन लोकांनी मनीकंट्रोलने आपल्या संकेतस्थळावर यासंदर्भातील वृत्त दिले. …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात

 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात २९९ उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने २०४ उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार …

Read More »

सचिन सावंत यांच्या एक्सवरील तक्रारीवरून निवडणूक आयोगाने घेतली गंभीर दखल

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत घटनात्मक पदावर असलेल्या प्रमुख व्यक्तींकडून मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांकडून आयोजित सरकारी बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंक …

Read More »

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अंशू सिन्हा यांची नियुक्ती महाराष्ट्र बाल हक्क आयोगावर करण्यात आली आहे. तर दिलीप गावडे यांची डेअरी डेव्हलमेंटच्या …

Read More »

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात …

Read More »

नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, …नरेंद्र मोदी इलेक्टोरल बाँडच्या खंडणीवर गप्प का?

काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडालेली दिसत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लिगची छाप असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप हास्यास्पद असून इतिहासाचा अभ्यास नाही हे स्पष्ट दिसते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश रस्त्यावर उतरला …

Read More »