Breaking News

सोलापूर -चंद्रपूरात तापमान ४२ वर, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस

एकाबाजूला राज्यात लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकिय वातावरण तापत असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातही निसर्गातील उष्मा भलताच वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण सहाही महसूली विभागात कधी उष्णतेचा पारा कधी ४०-४२ पार जाताना दिसून येत आहे. तर काही भागात तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. सोलापूर आणि चंद्रपूर येथे ४२.४ अंश …

Read More »

ममता बॅनर्जी यांचा आरोप, भाजपा केंद्रीय यंत्रणाकडून धमक्या…

मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालबरोबरच देशातील इतर राज्यांमधील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए आणि सीबीआयकडून धाडसत्र सुरु आहे. तसेच धाडीनंतर सदर नेत्याला या केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून भाजपासोबत जा नाहीतर तुरुंगात जाण्यास तयार रहा अशा धमक्या देण्यात येत असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यापार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, खडसेंच्या प्रवेशावर केंद्र आणि राज्य समिती…

भाजपा पक्षात येण्याचा जर एकनाथ खडसे यांचे मत असेल, तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करत आहोतच. पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही कारण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातला भारत आणि त्या उद्देशासाठी येणारी जी काही लोक आहेत, नेते आहेत त्यांचे स्वागत आहेच. …

Read More »

एकनाथ खडसे यांनी सीडी न वाजवताच दिल्ली मार्गे भाजपात वापसी

२०१४ साली राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे सरकारमधील विविध अशा आठ खांत्यांचा कार्यभार देण्यात आला. त्यानंतर भोसरी येथील जमिनीप्रकरणी आणि कल्याण येथील सरकारी जमिन देण्याच्या कथित घोटाळा आणि दाऊदशी फोन वरून बोलल्याच्या कथित प्रकरणावरून अखेर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा …

Read More »

जयराम रमेश म्हणाले, श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीगबरोबर सरकार…

काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या एका दिवसानंतर, सूत्रांनी सांगितले की, पक्षाने सर्वोच्च भारतीय राष्ट्रीय, विकासात्मक सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) गटाच्या नेत्यांसह संयुक्त रॅलींसह जाहीर रॅली काढून जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत पहिली सभा १२ एप्रिल …

Read More »

टेल्साचा प्रकल्प कर्नाटकात ? मंत्र्याची सावध भूमिका टीव्ही मोहनदास पै यांच्या प्रतिक्रियेनंतर मंत्र्याची सावध भूमिका

कर्नाटकचे उद्योग मंत्री एम बी पाटील यांनी फॉक्सकॉन किंवा टेस्ला सारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे राज्य ज्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करत आहे त्याबद्दल तपशील देण्याचे टाळले. आरीन कॅपिटलचे चेअरमन टीव्ही मोहनदास पै यांनी केलेल्या टिप्पणीनंतर पाटील यांची सावध भूमिका शुक्रवारी समोर आली. इलेक्ट्रिक कार प्लांटच्या स्थापनेबाबत तेलंगणा सरकार आणि टेस्ला यांच्यात …

Read More »

व्होडाफोन-आयडीयाचे २० हजार कोटींचे शेअर्स लवकरच बाजारात निधी उभारणीसाठी शेअर्स विक्री करण्याचा निर्णय

मोबाईल नेटवर्क ऑपरेटर व्होडाफोन आयडियाची फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे ₹२०,००० कोटींची शेअर विक्री महिनाभरात बाजारात येण्याची अपेक्षा आहे असून साधारणतः महिनाभरात हे शअर्स पब्लिक ऑफर्सच्या माध्यमातून बाजारात येणार असल्याची माहिती बिझनेस लाईन या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिली. रोड शोच्या माध्यमातून आधीच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून यासाठी पाठिंबा मिळवला आहे. इश्यूचा मोठा …

Read More »

विप्रोचे नवे सीईओ श्रीनी पलिया ऋषद प्रेमजी यांची माहिती

आयटी क्षेत्रातील प्रमुख विप्रो कंपनीचे सीईओ थियरी डेलापोर्टे, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता विप्रोच्या नवे सीईओ म्हणून श्रीनी पलिया यांची नेयुक्ती करण्यात आली आहे. थिअरी डेलापोर्टे यांनी नेमका कशामुळे विप्रोच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला हे जरी तात्काळ समजू शकले नाही. तरी त्यांनी त्यांची आवड जपण्यासाठी म्हणून विप्रोच्या सीईओ …

Read More »

सोनम वांगचूक म्हणाले की, चीनने बळकावलेली भूमी…

लेह ॲपेक्स बॉडी (LAB) ने ६ एप्रिल रोजी चीनच्या चांगथांग सीमेवर ७ एप्रिल रोजी लेह-लडाखची असलेल्या भूभागावर चीनच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून हा भूभाग बळकावला होता. त्या विरोधात सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखालील लेह अॅपेक्स बॉडीकडून २१ दिवसांचे उपोषणाचे आंदोलन पुकारले. त्यानंतर आता साखळी पध्दतीने उपोषण आंदोलन सुरु केले. या …

Read More »

राजनाथ सिंग यांच्या आरोपाला पाकिस्तानचे प्रत्त्युतर

जर अतिरेक्यांनी भारतात घुसून येथील शांतता बाधित केल्यास अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देत अतिरेकी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यात येत असेल तेथेही घुसून भारत सरकार दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा सज्जड दम पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्याचा …

Read More »