राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना बदलत्या जीवनशैलीनुसार अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रशस्त निवास सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवेंद्रसिंह राजे भोसले पुढे बोलताना म्हणाले की, या संदर्भात …
Read More »हर्षवर्धऩ सपकाळ यांची मागणी, कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी …
Read More »अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभ ऑनलाईन सुविधांमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ, पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित करण्यात आली आहे. सुधारित प्रणालीमुळे लाभार्थ्यांना आता अनेक प्रक्रिया स्वतःच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन पूर्ण करता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक …
Read More »२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई
रेशनिंग विभागास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास शिधावाटप भरारी पथक आणि पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २० हजार लिटर डिझेलसदृश अवैध पेट्रोलियम पदार्थासह टँकर जप्त करण्यात आला असून सुमारे ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून …
Read More »राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ कैद्यांच्या क्षमतेते १२ हजार २५८ ने वाढ होणार
राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण १२ हजार २५८ ने बंदी क्षमतेत वाढ होणार आहे. त्यापैकी पालघर, नारायणडोह (अहिल्यानगर) व बारामती (पुणे) येथे अनुक्रमे १८, ३५ व ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित …
Read More »हसन मुश्रीफ यांची माहिती, एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या विकास शुल्कातील बदल तसेच विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवर शुल्क सवलतीबाबत शासन सकारात्मक
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रालयामध्ये आज राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, सीबीआयचे दोनवेळा छापे, मग महाराष्ट्र पोलीस काय करत होते? महाराष्ट्रात ‘जामतारा’ सारख्या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा;
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे पण ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर आरोप करत या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उद्योगस्नेही वातावरणामुळे राज्यात उद्योगांचे नवे पर्व श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाची राज्यात गुंतवणूक
राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्य शासन महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करीत आहे. त्यामुळे राज्यामध्ये सद्यस्थितीत उद्योगांचे नवे पर्व सुरू झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह राज्यात करीत असलेली गुंतवणूक त्याचे मूर्तीमंत उदाहरण …
Read More »प्रियांका गांधी यांचा आरोप, महिला आरक्षण विधेयकाला राजकारणाचा वास पंतप्रधान मोदी यांनी विधेयकाची माहिती पूर्ण दिली नाही
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि या कायद्याबाबत सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. प्रियांका गांधी यांनी या प्रस्तावाच्या हाताळणीवर आणि वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंमलबजावणीबाबत स्पष्टतेसाठी दबाव आणत आहेत. महिलांच्या आरक्षणाच्या चौकटीवरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये …
Read More »संसदेत महिला आरक्षणाच्या मुद्यावरून अखिलेश यादव आणि अमित शाह यांच्यात शाब्दीक चकमक महिलांसाठी ३३% आरक्षण लागू करण्यासाठी विधेयक आवश्यक -सरकारचा दावा
गुरुवारी लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान मुस्लिम महिलांच्या आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पुढील तीन दिवसांत भारताच्या संसदेत तीन महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. महिलांसाठी ३३% आरक्षण लागू करण्यासाठी ही विधेयके आवश्यक असल्याचा सरकारचा दावा आहे, …
Read More »
Marathi e-Batmya