Breaking News

एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या पाठीशी आता इम्तियाज जलिल पुरे मुंब्रा पण आता पुरा महाराष्ट्र हरा करेंगे

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीतील विजयानंतर एमआयएमच्या मुंब्रा येथील उमेदवार सहर शेख यांनी विजयी कार्यक्रमात बोलताना कैसा हराया, अभी हम लोगोंको पूरे मुंब्रा को हरा कर देना है असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह काही हिदूत्ववादी संघटनांच्या स्वयंघोषित नेत्यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत सहर शेख यांच्यावर टीकेची …

Read More »

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गंभीर दखल पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश

बदलापूर येथील लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.भविष्यात लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना दिले. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व शिक्षण …

Read More »

स्कॉट बेसेंट यांची स्पष्टोक्ती, रशियाकडून तेल कमी केल्याने २५ टक्के टॅरिफ कमी होण्याची शक्यता पॉलिटिको वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त केली शक्यता

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी संकेत दिले आहेत की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्कापैकी निम्मे शुल्क मागे घेण्याचा विचार करू शकते. गेल्या काही महिन्यांत नवी दिल्लीने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीत मोठी कपात केल्याचा हवाला त्यांनी दिला. ‘पॉलिटिको’ या अमेरिकन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्कॉट बेसेंट …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत लोकशाही सुरक्षित

“न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी बोलत होते. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, चंद्रपूर काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात योग्य समन्वय असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. बुलढाणा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार आणखी १० लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण

दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी १० लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून ४० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून आज संवाद साधला, त्यावेळी …

Read More »

यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो …

Read More »

दादाजी भुसे यांची माहिती. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त घेतलेल्या निर्णयाची माहिती

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा …

Read More »

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीस ४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ राज्य सरकारचा निर्णय, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला, या समितीच्या कार्यकाळास दि. ५ जानेवारी पासून दि. ४ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीसाठी (एक महिना) मुदतवाढ देण्यात आली आहे. …

Read More »

भारत निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून ईसीआयनेटची निर्मिती

भारत निवडणूक आयोगाने इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम)-२०२६ दरम्यान ‘ईसीआयनेट (ईसीआयएनईटी)’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भरत मंडपम, नवी दिल्ली येथे ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून, तसेच निवडणूक …

Read More »