Breaking News

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरिता रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अ, ब आणि क …

Read More »

विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली ४५ हजार पोलिसांना ‘गुड न्यूज’ पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट …

Read More »

एअर इंडियानंतर आता सरकारी मालकीच्या या कंपन्यांचे होणार खाजगीकरण १.७५ लाख कोटी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट

नवी दिल्ली: प्रतिनिधी एअर इंडियाची कमान टाटा समूहाकडे सोपवल्यानंतर आता केंद्र सरकार खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलेल. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मोदी सरकार अर्धा डझनहून अधिक कंपन्यांचे खाजगीकरण किंवा निर्गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणूकीकरणातून १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले …

Read More »

कोविडमुळे राहिलेला शब्द अजित पवारांनी केला पूर्ण: आमदारांना दसऱ्याचे गिफ्ट आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी: एक कोटींची भरघोस वाढ

मुंबई: प्रतिनिधी कोविड काळामुळे आलेल्या आर्थिक अडचणीमुळे रखडलेला आपला शब्द निर्बंधात दिलेल्या सवलतीं आणि आर्थिक बाजार सुरळीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी पूर्ण करत सणासुदीच्या ऐन तोंडावर आमदारांच्या विकास निधीत घसघशीत वाढ करत ४ कोटींचा करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षिय आमदारांना ही दसऱ्याची भेट ठरली …

Read More »

आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्य अंधाराच्या खाईत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्य सरकार अंधाराच्या खाईत लोटले गेले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारावर कारवाई करावी, अशी मागणीही उपाध्ये यांनी यावेळी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र …

Read More »

पीएनबीकडून व्याजदरात मोठी कपात; गृह, कार, सोने तारण कर्जावर सवलत फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत खास योजना

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेस्टिव्हल ऑफरअंतर्गत सोने तारण कर्जावरील (गोल्ड लोन ) व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सोन्याचे दागिने आणि सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या एसजीबी कर्जावरील व्याज दर १.४५ टक्क्यांनी कमी केला आहे. एसजीबी कर्जावर आता ७.२० टक्के आणि सोन्याच्या दागिन्यांवर ७.३० टक्के …

Read More »

स्वस्तात घर-मालमत्ता खरेदीची संधी, एसबीआयकडून मालमत्तांचा लिलाव ऑनलाईन ऑक्शन करता येणार

मुंबई: प्रतिनिधी तुम्ही स्वस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. एसबीआय मालमत्तांचा लिलाव करणार आहे. २५ ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी …

Read More »

भाजपाच्या टोकाच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने उत्तर नाही तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात केले. लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जाहिर प्रवेश केला. यावेळी …

Read More »

व्हॉट्सअॅपवर हाय करा आणि मिळवा १० लाखांचं कर्ज अशी आहे प्रोसेस

मुंबई: प्रतिनिधी तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची गरज असेल तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला ते मिळेल. यासाठी फक्त तुम्हाला व्हॉट्सअॅपवर हाय म्हणावे लागेल. त्यानंतर काहीमिनिटातच तुमच्या खात्यावर १० लाख रुपये जमा होतील. भारतात प्रथमच अशा प्रकारची सुविधा नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी इंडिया इन्फोलाईन (आयआयएफएल – IIFL) ने सुरू केली आहे. कंपनीने १० लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज त्वरित देण्याची योजना सुरू केली आहे. हे कर्ज तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळेल. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना हे कर्ज काही मिनिटांत मिळू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, इंडिया इन्फोलाईन ही योजना सुरू करणारी देशातील पहिली कंपनी आहे. यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असेल. या कर्जासाठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरेल. याद्वारे वापरकर्त्यांचे तपशील तपासले जातील. यातून फक्त कर्जदाराचा अर्ज आणि केवायसी पूर्ण होईल. यासह बँक खाते देखील याद्वारे व्हेरिफाय केले जाईल. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान १० हजार आणि कमाल १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ   शकता. तुम्हाला हे कर्ज ५ वर्षात म्हणजेच ६० महिन्यांत परत करावे …

Read More »

समीर खान यांच्यावर एनसीबीने केलेल्या कारवाईवर कोर्टाचे प्रश्नचिन्ह एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला …

Read More »