Breaking News

जिंदाल कंपनी करणार राज्यातील या जिल्ह्यांमध्ये ३५,५०० कोटींची गुंतवणूक एमआयडीसी आणि जेएसडब्लू मध्ये सामंजस्य करार

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून आज नामांकित जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आज झालेल्या करारांनुसार जेएसडब्ल्यू कंपनी Hydro व पवन उर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य …

Read More »

वडेट्टीवार मोठे विधान,….प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा द्यायला तयार ओबीसी आरक्षणावरून वातावरण पुन्हा तापणार

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रलंबित पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि रिक्त झालेल्या पंचायत समित्यांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला. तरीही राज्यातील राजकारण ओबीसी आरक्षणावरून पुन्हा तापणार असल्याचे दिसून येत असून माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देण्यास तयार असल्याचे मोठे वक्तव्य राज्याचे …

Read More »

प्रविण दरेकरांचे राष्ट्रवादीच्या चाकणकरांना प्रत्युत्तर, म्हणाले… हा तर वडयाचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार

मुंबई: प्रतिनिधी माझे वक्तव्य नीट ऐकले असते तर त्याचा अर्थ कळला असता, पण हे दुसरं काही नाही तर वड्याचं तेल वांग्यावर काढायचा प्रकार आहे. कारण अशा वक्तव्यांमुळेचं त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते, त्यामुळे आपण अशा वक्तव्यांना फार महत्त्व द्यावे असा आपल्याला वाटत नसल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी …

Read More »

“त्या” वक्तव्यावरून प्रविण दरेकरांना राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांचा इशारा थोबाड आणि गाल रंगवू शकतो, माफी मागा

मुंबई : प्रतिनिधी शिरूर येथील एका कार्यक्रमात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करायच्या नादात जीभ घसरली. येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष असल्याची टीका करत पायरी सोडल्याचे दिसून …

Read More »

केंद्राची मंजूरी मिळाली तरच मुंबईतल्या या इमारतींचा पुनर्विकास होणार गृहनिर्माण विभागाला प्रतिक्षा केंद्राच्या मंजुरी

मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील जून्या व मोडकळीस आलेल्या आणि रखडलेल्या इमारतींच्या पुर्नविकास म्हाडा मार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत यासंबधीचे विधेयकही विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर करून घेतले. मात्र राज्य सरकारने मंजूर केलेल्या या विधेयकाला अद्याप केंद्र सरकारने मान्यता दिली नसल्याने या इमारतीच्या पुनर्विकासाचे प्रकल्प म्हाडा हाती घेवू शकणार नाही आणि …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठबळ देण्याची ग्वाही देत केल्या या सूचना अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, …

Read More »

कोरोना : रूग्ण संख्येत चांगलीच घट पण होम क्वारंटाईन जास्त २ हजार ७४० नवे रूग्ण, ३ हजार २३३ बरे होवून घरी तर २७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोस्तव सुरु होवून चार दिवस होत आले तरी अद्याप राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ न होता त्यात घटच होत असून ही महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज २ हजार ७४० नवे बाधित रूग्ण आढळून आले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात …

Read More »

पाटलांचा मुश्रीफांवर पलटवार…. व्हाईट मनी आहे की वर्गणी म्हणून गोळा करणार? धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी करा

पुणे : प्रतिनिधी आरोपामुळे हडबडलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला वादात ओढले आहे. आज काल इतके १०० कोटींचे घोटाळे उघडकीस येत आहेत की आता ही रक्कमच शुल्लक वाटू लागली आहे. जर किरीट सोमय्या यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकायचा असेल तर त्यासाठी स्टँम्प ड्युटी भरायला लागणारा व्हाईट मनी आपल्याकडे आहे की …

Read More »

बार्टीला दिला अखेर निधी; कोणत्याही योजनेला निधी कमी पडू देणार नाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी …

Read More »

साकिनाका प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ग्वाही: राजकारण आणू नका -SC आयोग •मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका येथे महिलेवरील बलात्कार आणि त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील …

Read More »