Breaking News

न्यूज वाल्यांचा कोयंडा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची प्रसारमाध्यमांची समाजावर पडलेल्या कोयंडारूपाची कथा

गावांत  कोरोनाची  बातमी  अचानक  गायब  झाली. कुणी तरी आत्महत्या केल्याची बातमी सतत टीव्हीला येऊ लागली. लोकांना खूप काहीतरी तूटल्या सारखं वाटू लागलं. एखाद्या गोष्टीची सवय लागली आणि ती सवय अचानक थांबली की मेंदू सैरभैर होतो, तसं गाववाल्यांच झालं. अचानक कोरोनाची बातमी गेल्यापासून लोकांच्या घशाखाली घास उतरे ना. कोरोना अचानक नाहीसा  झाल्यापासून. लोक बिंधास्त तालुक्याला जाऊ लागली. एकमेकांशी बोलू लागली. एकमेकांच्या घरात चहापाणी करू लागले. एकंदरीत सगळं काही चंगासी होऊन गेलं. गावांत चावडीवर बसून आता एकच चर्चा सुशांत सिंग राजपुत. अनिल हा गावाचा खबरी माणूस चुली पासून दिल्ली पर्यंतच्या सगळ्या खाजगी बातम्या त्याला दिवसभरात कोण कुठून पोहोचवायचा हे तोच …

Read More »

शिक्षकांना दिलासा: कोविड कामातून मुक्त तर सरप्लस शिक्षकांना शाळेत बोलविणार शालेय शिक्षण विभागांचे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड प्रसार रोखण्यासाठीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्या कामातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देत सरप्लस अर्थात अतिरिक्त शिक्षकाना त्यांच्या जवळच्या किंवा मूळ शाळांमध्ये बोलावून ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांचा उपयोग करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने आज राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती …

Read More »

कोरोना : बाधितांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त मात्र एकूण संख्या ६ लाखांवर ८४९३ नवे बाधित रूग्ण, ११ हजार ३९१ बरे झाले तर २२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ४ हजार ३५८ वर पोहोचली असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आज ८४९३ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाल्याने १ लाख ५५ हजार २६८ इतक्यावर पोहोचली असून ११ हजार ३९१ हजार बरे होवून घरी गेल्याने एकूण घरी जाणाऱ्यांची ४ लाख ३८ हजार …

Read More »

भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी आणि साक्षीदाराचे निधन ससून रूग्णालयात घेतला सुरेश सकट यांनी घेतला शेवटचा श्वास

पुणे : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव हल्ल्यातील  मुख्य फिर्यादी व साक्षीदार असणारे सुरेश सकट यांचे आज पुणे येथील ससून रूग्णालयात  निधन झाले. भीमा कोरेगाव लढ्यात ते अग्रणी होते यामध्ये त्यांनी त्यांचे घरदार गमावले आहे. याच प्रकरणामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीची पूजा सकट हीची हत्या/ आत्महत्या देखील घडवण्यात आली होती. न्याया शिवाय आणि धर्मांतराच्या इच्छेशिवाय …

Read More »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी राज्यात १ हजार ९२० जागांवर मिळणार प्रवेश-अल्पसंख्याक मंत्री मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनामध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले. राज्यात …

Read More »

बदल्यांची सीआयडी चौकशी करा अन्यथा न्यायालयात दाद मागणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले, कोरोनाच्या उपाययोजनात सातत्य न राहिल्याने जनतेचे जीवित संकटात आले, बदली कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले व बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. बदल्यांच्या सीआयडी चौकशीचा आदेश द्यावा, …

Read More »

एस.ए.तागडे सामाजिक न्यायचे प्रधान सचिव तर डॉ. देशमुख पुणे जिल्हाधिकारी अन्य ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिव पदी एस.ए.तागडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर हाफकिन औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकिस संचालक डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली. सनदी अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती सचिव …

Read More »

कोरोना: आतापर्यंत मृत्यू २० हजारापार, अडीच महिन्यात १७ हजार मृत्यू ११ हजार १११ नवे बाधित ८८३७ बरे झाले, २८८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जवळपास १८ हजारच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झाले. यापैकी मे महिन्याअखेर २२०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र जून महिन्यात यात ५ हजार ३०० जणांच्या मृत्यूची भर पडत ही संख्या जून अखेर ७ हजार ८५५ वर पोहचली. १ जुलै रोजी  ८०५३ वर …

Read More »

रूग्णालय अधिक्षकांनी हमी दिल्यानंतर डॉक्टर-अधिपरिचारिकांच्या विरोधातील आंदोलन मागे गरोदर महिलेला दाखल न करून घेता त्रास दिल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

सांगोला: प्रतिनिधी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला रूग्णालयात दाखल करून घेता त्यांना ताटकळत ठेवून त्यांना मानसिक व शाररिक छळ केल्याच्या निषेधआर्थ  सामाजिक कार्यकर्त्ये बापूसाहेब ठोकळ यांच्यासह सामाजिक संघटनांनी निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२० स्वातंत्र्यदिनीच धरणे आंदोलन करत उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे अखेर ग्रामीण रूग्णालयाच्या अधिक्षकांनी रूग्णांवरील उपचारात हेळसांड केली …

Read More »

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी १७ ऑगस्टला धरणे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने करण्यात येणार आंदोलन

गडचिरोली: प्रतिनिधी नोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात १७ ऑगस्ट २०२० रोज सोमवारला दुपारी २.३० वाजता घरच्या घरून धरणे आंदोलन करण्यात येणार असून गडचिरोलीसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयत संघटनेच्यावतीने केवळ तीन किंवा चार जण निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली. महाराष्ट्रातील जवळपास ४० हजार मागासवर्गीय कर्मचारी ३ वर्षापासून पदोन्नतीसाठी वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्णयाला …

Read More »