पुणेः विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळांच्या परिक्षा, महाविद्यालय, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि खाजगी आस्थापनाच्या संदर्भात काढलेले आदेश हे ३१ मार्च २०२० पर्यंतच लागू राहणार नाहीत, तर राज्य सरकारकडून पुढील आदेश निघेपर्यंत राज्याला लागू राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणे …
Read More »आरोग्य मंत्री म्हणाले, कोरोनाच्या ३ टप्प्यात जायचे नाही अन्यथा कठोर निर्णय राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी गर्दी टाळावी. आत्ता कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आहे, तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहेत. मात्र नागरीकांनी गर्दी करणे टाळले नाही तर प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील असे सांगत रेल्वे, बससेवा बंद करण्याचे संकेत आरोग्यमंत्री …
Read More »महेश मांजरेकर घेणार ऑनलाईन ऑडिशन वर्क फ्रॉम होमचा असाही फायदा
मुंबईः प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने आवाहन केल्याप्रमाणे मराठी चित्रपट उद्योगाने आपल्या चित्रपटाचे सर्व काम बंद केले. तसेच सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्क फ्रॉम होमही करत आहेत. मात्र या संधीचे सोने करण्याची योजना प्रसिध्द चित्रपट निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी आखली असून आपल्या आगामी चित्रपटासाठी लागणाऱ्या …
Read More »पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द दहावीचे दोन पेपर वेळापत्रकानुसार होणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करत नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेतल्या जाणार असल्याचे सांगत दहावीच्या परीक्षेचे दोनच पेपर हे शिल्लक राहिले असल्याने ते नियोजित वेळात्रकानुसारच असून त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सीबीएसई आणि इतर …
Read More »कोरोनाग्रस्तांच्या विलगीकरण कक्षासाठी आदर्श बिल्डींग? रूग्णालयांच्या जागा कमी पडत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या रूग्णांच्या संख्येत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यानाही या आजाराची लागण होत असल्याने विलगीकरण कक्ष निर्माण करण्यासाठी खाजगी हॉटेलची मदत घेण्यात येत आहे. मात्र सरकारच्या जमीनीवर उभ्या असलेल्या ३१ मजली आदर्श इमारतीचा वापर सरकारकडून का करण्यात येत …
Read More »लोकल, बस, बँका आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद शासकिय कार्यालयातील २५ टक्केवर सुरु राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी संपूर्ण जगावर लढण्याऐवजी थांबण्याची वेळ आली आहे. सततची वाढती गर्दी ओसरण्यास सुरुवात झालेली असली तरी ही गर्दी पूर्णपणे बंद होण्यासाठी मुंबईसह राज्यातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र मुंबईतील लोकल सेवा, बसेस आणि बँका वगळता गर्दी होण्यास कारण ठरणारी सर्व …
Read More »पंतप्रधानाचे आवाहन, २२ मार्चला घराबाहेर पडू नका जनता कर्फ्यु लागू राहणार
नवी दिल्लीः विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाला रोखण्यासाठी २२ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे. यादिवशी नागरीकांनी सकाळी ७ ते रात्रो ९ वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जनतेला उद्देशून केलेल्या भाषणा दरम्यान त्यांनी वरील आवाहन केले. त्याचबरोबर त्यादिवशी …
Read More »शासकिय नियमाचा गृहनिर्माण मंत्र्यांकडूनच भंग बैठका टाळण्याचे आदेश असतानाही बंगल्यावर अधिकारी विकासकांसोबत बैठका
मुंबईः विशेष प्रतिनिधी दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्यावर नियंत्रण आणि मंत्रालयासह शासकिय कार्यालयांमध्ये बैठकांचे आयोजन करू नये असे आदेश नुकतेच काढले. मात्र या आदेशालाच केराची टोपली दाखवित गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या बंगल्यावर विकासक, अधिकाऱ्यांचा दिवसभर बैठकांचा धडाका लावल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना व्हायरसचा …
Read More »शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवायचीय मग वाचा हे उपाय आयुर्वेदीक डॉक्टर शेखर मगर यांचा सल्ला
पावसाळा आला की ताप, थंडी, सर्दी, न्युमोनिया आदी आजारांचा सामना करावा लागतो. तर हिवाळ्यात सर्दी, कफचा त्रास यासह अन्य आजारांचा सामना करावा लागतो. तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन, हिवताप, ताप येणे आदी सारख्या आजारांचा सामना व्यक्तींना करावा लागतो. त्यामुळे ऋतु कोणताही असो पण जर माणसाच्या शरीराची प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर …
Read More »कोरोनाच्या लढाईत वैद्यकिय शिक्षण मंत्र्याची पहिल्यांदा हजेरी १३३० बेडचे 'विलगीकरण कक्ष' कार्यान्वित होणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जाणवायला लागल्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मदतीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेच धावल्याचे चित्र दिसत असताना राज्य मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मात्र कोठेच दिसत नव्हते. अखेर चार-पाच दिवसानंतर त्यांनी पहिल्यांदाच बैठक घेतल्याचे दिसून येत …
Read More »
Marathi e-Batmya