महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला …
Read More »प्रताप सरनाईक यांचा इशारा, अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी कडक पावले उचलणार
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतूकीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या बांद्रा येथील कार्यालयात मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम (SIR) निष्पक्षपणे राबवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी
निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अनेक राज्यातून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक विशिष्ट जाती, धर्माची मते वगळण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही राज्यात निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक केलेल्या एस.आय.आर. मोहिमेत प्रचंड घोटाळे झाल्याचे दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाला यातून फायदा होईल अशा पद्धतीने ही मोहिम राबवली जात असल्याचे दिसून …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईतील कोळीवाडा आणि गावठाण सीमांकनाचा निर्णय तातडीने घ्या मुंबईचा प्रश्न लोकसभेत केला उपस्थित
मुंबईचे मूळ रहिवाशी कोळी बांधवांच्या कोळीवाडे आणि गावठाणांच्या सीमांकनाचा प्रश्न गंभीर असून खार दांडा येथील इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. ज्यांना घरे बांधायची आहेत, त्यांना तातडीने परवानगी मिळाली पाहिजे. मुंबईतील कोळीवाडा आणि गावठाण सीमांकनाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली. खासदार प्रा. …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतक-यांना तातडीने मदत दिली जाईल राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान
“राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (अवकाळी) १ लाख २२ हजार हेक्टरहून ( ३ लाख ५ हजार एकर) अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करुन बाधित शेतक-यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल” अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मोठ्या शहरांमध्ये होणार मायक्रो झोनिंग जनतेच्या हितासाठी रेडी रेकनर दरवाढ फेटाळली
सध्याची जागतिक स्थिती व युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हितासाठी मालमत्तेच्या दरात १२ ते १४ टक्क्यांपर्यंतची दरवाढ नाकारली, असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. Chanचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि संभाजीनगर यांसारख्या मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये आता ‘मायक्रो झोनिंग’ केले जाणार आहे. यामुळे प्रत्येक मालमत्तेचा दर हा …
Read More »भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मंत्रिमंडळ निर्णयामुळे १० हजारांहून अधिक पदांच्या आकृतीबंधास मंजुरी
राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेत झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर बुधवारी ( दि. १ एप्रिल ) शिक्कामोर्तब करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने भूमि अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. यामुळे विभागातील पदरचना …
Read More »भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला मंजूरी
भूमि अभिलेख विभागातील गट क संवर्गातील भूकरमापक हे पद रद्द करून परिरक्षण भूमापक असे पद निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ही पदे रद्द करण्यात आलेल्या भूकरमापक संवर्गातून नियमित पदोन्नतीने व विभागीय परीक्षेद्वारे प्रत्येकी ४० टक्के आणि सरळसेवेने २० टक्के या …
Read More »अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती विविध निवेदन, अर्जांवर वाचून निर्णय घेण्यासाठी समिती-राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण समितीच्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यावर या विषयावर प्राप्त निवेदने, अर्जांचा विचार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी पाटणा उच्च …
Read More »राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे शिशुवर्ग ते आठवी, नववी ते दहावी तसेच अकरावी व बारावीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ होणार आहे. महाराष्ट्राच्या व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास वृध्दिंगत करणे …
Read More »
Marathi e-Batmya