मुंबई

एस.ए.तागडे सामाजिक न्यायचे प्रधान सचिव तर डॉ. देशमुख पुणे जिल्हाधिकारी अन्य ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिव पदी एस.ए.तागडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर हाफकिन औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकिस संचालक डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली. सनदी अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती सचिव …

Read More »

गणेशोत्सवासाठीची कोंकण रेल्वेची पहिली रेल्वे उद्या धावणार उद्यापासून बुकींग आणि गाडी धावणार

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सव काळात मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यास अखेर यश आले असून १५ ऑगस्ट २०२० पासून कोकणात जावू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर २०० गाड्या धावणार असल्याची माहिती कोकण आणि मध्य रेल्वेने एका प्रसिध्दी पत्रकान्वये आज जाहीर …

Read More »

MPSC परिक्षेच्या तारखेत पुन्हा बदल २० सप्टेंबर रोजी होणार

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा नियोजित तारखेला घेण्याऐवजी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही परिक्षा जून आणि नंतर १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु आता त्याही तारखेची परिक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता ही परिक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार …

Read More »

आता म्हाडाच करणार उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना इमारत पुनर्विकासाबाबत दिलासा म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.या सुधारणांनुसार अर्धवट अवस्थेतील अथवा कुठलेही काम सुरु केलेले नसलेले प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)  यांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकल्पांकरीता …

Read More »

म्हाडा उपाध्यक्ष म्हैसकर यांची पुन्हा मंत्रालयात बदली अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची तेथून बदली करण्यात आली असून त्यांच्या महसूल व विभागापैकी वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासह अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आज राज्य सरकारने केल्या. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे …

Read More »

पोलिस सायबरमध्ये इंटर्नशीप करायचीय मग या ईमेल वर बायोडेटा पाठवा महाराष्ट्र सायबर विभागाकडून अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सायबर विभाग पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे १२-८-२०२० पर्यंत पाठवावा. यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005 इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे …

Read More »

आणि मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा करावा लागला मुक्काम कालच्या पावसामुळे सगळीकडेच पाणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात ४७ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस काल पडला. तसेच मंत्रालयातील प्रमुख तीन प्रवेशद्वारावर निसर्गाने अवकृपा दाखविल्याने अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेरच पडता आले नाही. त्यामुळ‌े अखेर या १५ टक्के उपस्थिती राहीलेल्या बहुतांष अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री मंत्रालयातच मुक्काम ठोकावा लागला. काही महिन्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तिन्ही मार्गावरच्या उपनगरीय रेल्वे …

Read More »

मुंबई आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई व परिसरात  सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. कालपासून  जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी …

Read More »

राम प्रधानांच्या निधनाने शरद पवारांना झाले दु:ख, आठवणी जागवित वाहीली श्रध्दांजली सकाळी ९२ व्या वर्षी प्रधानांचे निधन

मुंबई: प्रतिनिधी राम प्रधान यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले …

Read More »

माजी केंद्रीय गृहसचिव आणि अनेक समित्यांचे प्रमुख राम प्रधान यांचे निधन ९२ व्या वर्षी वार्धक्यामुळे घेतला शेवटचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज सकाळी ८.३० वाजता वार्धक्यामुळे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. माजी केंद्रीय गृहसचिव होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतरच्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव …

Read More »