फार पूर्वी २०१४ पूर्वीच्या कोणी एके काळी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आणि भारत देशावरही होती. परंतु सत्ता राखण्यासाठी आणि जातीय समिकरणं कायम राखण्यासाठी खोट्या माहितीचा आधार घेतल्याची चर्चा कधी ऐकिवात नाही. पण सध्या महाराष्ट्रात आणि भारताच्या केंद्रातील सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून खोट्या माहितीचा प्रचार सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३२० व्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीकोनातून कर्मठ आणि अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. तसेच अमित शाहवर कसे अभ्यासू आणि कर्मठ असल्याची स्तुती सुमनंही उधळली. मात्र याच स्तुती सुमनांचा त्रिफाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच चांगलाच उडवल्याचे दिसून आले.
आतापर्यंत खोटी माहिती पसरविण्यात भाजपाच्या आयटी सेलचा हात कोणी धरू शकत नव्हते, पण आता या खोट्या माहिती पसरविण्याच्या कामात देशाचे गृहमंत्रीही सहभागी असल्याचे दिसून आले आहे.
शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शेवटचे भाषण करायला पाचारण करण्यात आले. त्यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रात शिवजयंतीची सुरवात तिलक महाजारांनी केल्याची अतिशय महत्वाची माहिती सांगितली. पण महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा ऐतिहासिक महापुरुषांच्या यादीत तिलक महाराज नामक व्यक्तीचा उल्लेख अद्याप तरी आमच्या सारख्या वाचन प्रेमींच्या वाचनात आला नाही. त्यामुळे हे तिलक महाराज कोण असा प्रश्न आम्हाला प्रश्न पडला. मात्र याच नावाचे साधर्म्य असलेले ज्यांना ब्रिटीशांच्या काळात आणि काँग्रेसच्या इतिहासात असंतोषाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगांधर टिळक असल्याचे आम्हाला आढळून आले. तसेच त्यांनी महाराष्ट्रात शिवजयंतीची नाही तर गणशोत्सवाची सुरुवात केल्याची नोंद अद्याप तरी इतिहासात आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या भाषणातील तिलक महाराज हे लोकमान्य टिळक तर नव्हे का असा प्रश्न पडला आहे. तसेच जर ते लोकमान्य टिळक जर असतील तर ते तिलक महाराज कधी झाले किंवा कधी होते असा या निमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे.
छत्रपति शिवाजी महाराज जी की पुण्यतिथि पर महाराष्ट्र के रायगढ़ किले पर आयोजित कार्यक्रम से लाइव…
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन मातृभूमीची सेवा आणि सुशासनाचा आदर्श आहे.शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमातून लाईव्ह. https://t.co/TJgTfa81cD
— Amit Shah (@AmitShah) April 12, 2025
अमित शाह यांनी लोकमान्य टिळकांना शिवाजी महारांजाच्या शिवजयंतीचे सर्व श्रेय देत असताना मात्र ज्या राज्य सरकारने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली. त्या महात्मा फुलेंचा विसर अभ्यासू आणि कर्मठ अमित शाह यांना पडला की, त्यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली नाही असा या निमित्ताने नवा प्रश्न पडला आहे. कारण दरवर्षी राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क आणि उच्च व तंत्रज्ञान शिक्षण विभागाकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या समग्र महात्मा फुले या पुस्तकात साताराच्या भोसले घराण्याला आणि कोल्हापूरच्या घाटगे घराण्याला ज्या शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरील समाधी सापडली नव्हती, ती समाधी पहिल्यांदा महात्मा फुले यांनी शोधून काढली अशी नोंद आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर पहिला पोवाडा लिहून तो प्रसिद्ध केला तो महात्मा फुले यांनीच याची नोंद ही सरकार दरबारी आहे. असे असताना या सर्व गोष्टींचे यश लोकमान्य टिळक किंवा तिलक महाराजांच्या नावे खपविण्याचा उद्योग अमित शाह यांनी करणे म्हणजे, भाजपाच्या फेक नॅरेटीव्हचा भाग तर नाही ना अशी शंका घेण्यास भरपूर वाव निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान या वास्तवादी इतिहासाची पुरेशी कल्पना त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना दिली असती तर त्यांनीच स्तुती सुमनं उधळलेल्या नेत्यावर त्यांच्या वक्तव्याचा त्रिफाळा उडविण्याची वेळ आली नसती असे मत महाराष्ट्रातील काही अभ्यासू लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जय भवानी, जय शिवाजी 🚩
LIVE | मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्यासमवेत राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित@AmitShah#Maharashtra #Raigad #ChhatrapatiShivajiMaharaj
🕧 दु. १२.३३ वा. | १२-४-२०२५📍रायगड. https://t.co/dRgfjVmcly
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली किंवा शिवजयंतीची सुरुवात कोणी सुरु केली याची माहिती देण्यासाठी अमित शाह यांना ओबीसी नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून तरी माहिती घ्यायची किंवा त्याचे संदर्भ तरी मागून घ्यायचे जेणे करून असे धडधडीत खोटे बोलण्याची पाळी तर अभ्यासू आणि कर्मठ अमित शाह यांच्यावर आली नसती.
Marathi e-Batmya