राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडत आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र २०१४ साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पार्ट वन असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावेळी त्या पार्ट वन मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राजकिय गेम करण्यात आला होता. त्यांचा राजकिय गेम करण्यात कोणाचा मोठा हात होता याची त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अर्थात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असल्याची रंगली असतानाच या पार्ट-२ मध्ये पुन्हा एकदा एकनाथ (शिंदे) नावाच्याच व्यक्तीचा राजकिय गेम होणार तर नाही ना अशी चर्चा राजकियव वर्तुळात सुरु झाली आहे.
त्यातच राज्याच्या गृहमंत्री पदावरुन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नव्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशीरापर्यंत चर्चा झाली. मात्र भाजपा कडून अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते देण्याऐवजी महसूल, सामान्य प्रशासन आणि नगरविकास ही तीन अतिरिक्त खाती देण्याची तयारी दर्शविली आहे. पंरतु एकनाथ शिंदे यांनी या मंत्रिपदावर सहमत न झाल्याने ही चर्चा सर्वाधिक काळ सुरु राहुनही फिस्कली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पार्ट-२ मध्ये पुन्हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय गेम तर होणार नाही ना अशी चर्चा व्यक्त या निमित्ताने सुरु झाली आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार उदय सामंत, भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, आमच्या ५९ आमदारांपैकी कोणीही उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छूक नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही आणि त्यांनी आमच्यावर एखादी जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर ती आम्हीदेखील स्वीकारणार नाही, हे आम्ही शिंदे साहेबांना स्पष्टपणे सांगितले आहे. या सरकारमध्ये आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या योजनांची कायमस्वरुपी अंमलबजावणी करण्यासाठी ते देवेंद्रजींना सहकार्य करतील, एकत्र बसून महाराष्ट्रातील निर्णय होतील, ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाचंही नाव येऊ नये, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आमच्या कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की, या खुर्चीवर जाऊन बसावं. हा खुलासा करावं लागणं हे आमचे दुर्दैव आहे. आम्ही नेता एकनाथ शिंदे यांनाच मानतो. आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातात दिलं आहे. त्यामुळे त्यांना डावलून कोणी काहीतरी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी दिला. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे.
Marathi e-Batmya