जयंत पाटील यांची मागणी, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्या मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला

मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला आहे. केंद्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील यांनी याबाबत सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला आहे. मात्र, त्याचा लाभ देशातील सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला दिसत नाही.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अद्यापही जास्त आहेत व याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत असून त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतकरी, कामगार, व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय नागरिक यांना वाढत्या खर्चाचा मोठा फटका बसत आहे.

शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही विनंती अशी मागणी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा

राज्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगाने होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *