मनोज जरांगे पाटील यांची मागणी, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा नेत्यांना गावात न येण्याचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नी चाललेल्या आंदोलनाची माहिती का दिली नाही असा सवाल उपस्थित करीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचे विशेष विधिमंडळ अधिवेशन बोलवावे अशी मागणी आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे -पाटील यांचे बेमुदत उपोषण शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

मराठ्यांना आरक्षण देण्याचा मार्ग सुचवण्यासाठी नेमलेल्या समितीचा कार्यकाळ राज्य सरकारने आज वाढविल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, समाजाला आरक्षण न देण्याचे कारस्थान महाराष्ट्र सरकार करत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका सिद्ध करण्यासाठी आम्ही सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला असून आवश्यक पुरावे सादर केले आहेत. या प्रश्नावर काम करणाऱ्या समितीचा कार्यकाळ त्यांनी वाढवला असेल तर हा मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा डाव आहे अशी टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, नेते आम्हाला आरक्षण देत नसतील आणि आमच्या गावात घुसून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी तेथे येत आहेत. त्यापेक्षा त्यांनी विधानसभेत जाऊन मराठा आरक्षणासाठी आवाज उठवावा. एक दिवसाचे विधानसभेचे अधिवेशन बोलावून सरकार आरक्षण देऊ शकते. ग्रामस्थांनी या नेत्यांना शांततेने रोखावे, आत्महत्या करू नका आणि आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा खरपूस समाचार घेत महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य सरकारच्या प्रमुखांनी का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *