मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ३० वॉर्ड असे आहेत. ते शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या. निवडणूक ही रणांगण असते आणि म्हणूनच जुन्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण करुन देतो असे सांगत ते म्हणाले की, ‘बंदूक भी तेरी, गोली भी …
Read More »हे तर केंद्र सरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला
मुंबई: प्रतिनिधी २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील भारताचा विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट असल्याचा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारला लगावला. ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी …
Read More »पदोन्नतीबाबत सकारात्मक निर्णय होईल, मी नाराज नाही… ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची स्पष्टोक्ती
मुंबई: प्रतिनिधी सरकारी सेवेत असलेल्या मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना मिळणारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करत आरक्षित पदेही खुल्या प्रवर्गातून भरण्याच्या निर्णया विरोधात काँग्रेसचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जाहिर भाष्य करत ७ मेचा तो शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त …
Read More »कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून पुढे जाऊ मात्र आरक्षणप्रश्नी भाजपा दुतोंडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी कुठल्या पध्दतीने ओबीसी आरक्षण देता येईल याबाबतीत कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करुन पुढे जाऊ. मात्र आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपाकडून नेहमीच दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दरम्यान या राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी …
Read More »मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या भाजपा खासदार नारायण राणे यांची महाविकास आघाडी सरकारकडे मागणी
ठाणे : प्रतिनिधी शिवसेना–काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात व …
Read More »BreakTheChain च्या निर्बंध आणि शिथिलतेबाबत मनात गोंधळ आहे? मग वाचा हे ३० मे २०२१ रोजी जाहीर ब्रेक दि चेन आदेशासंबंधी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे
प्रश्न १: कोविड निर्बंधांसाठी प्रशासकीय घटक (महानगरपालिका किंवा जिल्ह्याचा इतर भाग) क, ड किंवा ई यापैकी कोणत्या श्रेणीत असावे हे कोण ठरवते? उत्तर:- हे निर्णय जिल्हा व्यवस्थापन प्रशासन (डी एम ए) घेते आणि तात्काळ त्याची घोषणा करते. यानंतर वेगवेगळ्या प्रशासकीय घटकांसाठी तिथल्या आवश्यकतेनुसार सदर मापदंड ठरवले जातील. प्रश्न २- जर …
Read More »आदेशनुसार माहिती सादर न केल्यानेच ओबीसींचे आरक्षण गेले! अजूनही वेळ गेली नाही, तातडीने पाऊले उचला : देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास आघाडी सरकारने आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना तातडीने हाती घेतल्या पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचंय: गावं कोरोनामुक्त करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा नवा नारा
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात आलेली दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्याचे सारे श्रेय तुम्हा जनतेचे आहे. तिसरी लाट कधी येईल कोणत्या तारखेला येईल याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचं असल्याचा नारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. तसेच प्रत्येक गावच्या संरपंचाने …
Read More »आघाडी सरकार SC-ST च्या सर्व योजना बंद करण्यासाठीच काम करतेय माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप
नागपूर-मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रातील आघाडी सरकार अनु.जाती/अनु.जमाती यांच्या सगळ्या योजना बंद करण्यासाठी काम करते हे दिड वर्षातील सरकारच्या कामकाजावरून सिद्ध झाले आहे. हे सांगत असताना कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे सांगत नाही तर ह्या समाजाचा घटक म्हणुन मागील दिड वर्षात सरकार मागासवर्गीय समाजाचे संवैधानिक चौकटीतील निर्णय घेत नाही हे दिसून …
Read More »मोदींचे धोरण म्हणजे लसीसाठी पैसेवाल्यांना पंचतारांकीत सुविधा तर गरिबांसाठी रांग देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणा-या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा : नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली, पण सात वर्षात मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पहिल्या लाटेत नमस्ते ट्रम्पच्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलीगीच्या नावावर कोरोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा …
Read More »
Marathi e-Batmya