राजकारण

पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून ऑनलाईन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १० वी आणि १२ वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून १० वी आणि १२ वी नंतर पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात …

Read More »

टाळेबंदी हटवा अन्यथा दहा ऑगस्ट नंतर रस्त्यावर येवू वंचित बहुजन आघाडीचा इशारा!

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले. मात्र, सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षा पेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच २०१९साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे टाळेबंदी हटावावी आणि खऱ्या अर्थाने अनलॉक करावा. अन्यथा दहा ऑगस्ट नंतर …

Read More »

मराठी आर्किटेक्चर नाईक आत्महत्याप्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील मराठी आर्किटेक्चर अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी यादीत असलेल्या पत्रकार अर्णब गोस्वामी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. सध्या अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली ते राजकिय हेतूने आरोप करून महाविकास आघाडी …

Read More »

राज्यातल्या पावसाची पंतप्रधान मोदींनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंकडून माहिती मुंबई, कोकण आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्षांशी थेट मुख्यमंत्री संपर्कात

मुंबई : प्रतिनिधी मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काल …

Read More »

२.३ कोटी मुलांच्या शिक्षणासाठी देशातील पहिला गुगलचा क्लासरूम महाराष्ट्रात पहिलं राज्य असल्याचा सार्थ अभिमान-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असतांना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असतांना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे …

Read More »

रामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात मोगलाई अवतरली भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडविल्याची टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी मुंबईत केली.  प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. कोरोना …

Read More »

अतिरिक्त दुध योजनेतील दुध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री …

Read More »

आणि मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक थांबविली काळ पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाचा निर्णय

अलिबाग: प्रतिनिधी उपविभागीय अभियंता, राज्य महामार्ग विभाग, पेण यांनी माणगाव तालुक्यातील घोडनदीवरील कळमजे येथील पूलावरुन पाणी वाहत असल्याचे सांगितल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला असून काळ पूलावर जड वाहने थांबविण्यास मनाई करण्याबाबतही स्थानिक प्रशासनास कळविले आहे. त्यामुळे पुराचे पाणी कमी होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येत असून …

Read More »

दुकानावरील पाट्यावर आणि शासकीय कामकाजात मराठी भाषा वापरा अन्यथा… मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी उद्योग, उर्जा, विधी व न्याय आदी विभागांतील शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तत्काळ दूर करा, असे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागांना दिले. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालायत संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली. उद्योग विभागातंर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीसोबत मराठी भाषेत …

Read More »

परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं ही तर चाकरमान्यांची फसवणूक- भाजपा नेते अँड आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला, तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी …

Read More »