राजकारण

अवाढव्य वीज दरावरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल, वीज महाग का? सरकारकडे प्रचंड बहुमत, अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी

राज्यातील अवाढव्य वीज दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला घेरले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या विज महाग मिळत आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी असा टोलाही त्यांनी लगावला …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, संविधानाची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा: अन्यथा… कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे डॉ प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या २४ तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे. ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले …

Read More »

नाना पटोले यांचा निर्धार, बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे जनआंदोलन… मारकडवाडीतील गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या

भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन …

Read More »

मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला निषेध

सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने …

Read More »

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची माहिती,…महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी १,१३,२३६ कोटींची थेट परकीय गुंतवणूक-राज्यपालांनी अभिभाषण करत मांडली पुढील दिशा

महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर औद्योगिक राज्य असून देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये, राज्याचे १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान आहे. थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला अधिक पसंती मिळते. मागील आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी होता. तसेच सन २०२४-२५ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १,१३,२३६ कोटी रुपये इतक्या थेट परकीय …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, १०० दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करा महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका

वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजे, याची नव्याने रचना मुख्य सचिवांनी करावी. पहिली बैठक डिसेंबर अखेरीस व्हावी. एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच, पण दुसरी वॉररूम आता केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी असेल. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली…आता ‘लाडका भाऊ’साठी काम.. सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो, जनभावना पायदळी तुडवणे ही सत्तेची मस्ती

‘लाडकी बहिण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत, पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहिणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो …

Read More »

जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची सासऱ्यावरून एकमेकांना चिमटे राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना टोलेबाजी

राज्यातील विधानसभा निवडणूकीत अपेक्षा जास्त बहुमत मिळवित राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची रितसर निवडही करण्यात आली. या निवडीनंतर सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या नार्वेकरांच्या अभिनंदन पर ठरावावर बोलताना सासऱ्याच्या मुद्यावरून जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजी आणि काढलेले चिमटे चांगलेच रंगल्याचे पाह्यला …

Read More »

सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधत विधानसभेतील पहिल्याच भाषणातून रोहित पाटील यांची एन्ट्री पहिल्याच भाषणातून विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्ष वेधून घेतले

विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच विजय मिळविलेले रोहित पाटील यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीनिमित्त सभागृहातील अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना रोहित पाटील यांनी सुरेख शब्दपेरणी करणी सत्ताधाऱ्यांबरोबर विधानसभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या राहुल नार्वेकर यांचेही लक्ष वेधून घेतले. राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत मांडण्यात आलेल्या अभिनंदन …

Read More »

विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड …

Read More »