राजकारण

नाना पटोलेंचे नरेंद्र मोदींना आव्हानः महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर बोला पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून जनतेच्या पैशांची लुट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही …

Read More »

प्रविण दरेकर यांचा आरोप, ठाकरे कुटुंबाचा कट उद्योगविश्वाने उधळला जागतिक उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण

उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडसाठी पोटनिवडणूक जाहिर लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त जागांसाठी कार्यक्रम

पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मम जगताप यांचे दिर्घ आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. तसेच ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या निवडणूकाही जाहिर केला. …

Read More »

आदित्य ठाकरेंचे महापालिकेसह शिंदे गटाला आव्हान, या प्रश्नांची उत्तरे द्या सिमेंट रस्त्याच्या कंत्राटावरून विचारले थेट प्रश्न

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद मुंबई महापालिकेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंटचे करण्याची घोषणा करत त्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची निविदा जाहिर करत त्याचे वाटपही केले. या निविदा वाटपावरून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत निविदा वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच …

Read More »

निवडणूक आयोगः शिंदे गटाचं ग्राह्य धरा आणि चिन्हाचा निर्णय घ्या महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद करत आम्हाला पाठिंबा असल्याचा केला दावा

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडण्यास सुरूवात केली आहे. तर महेश जेठमलानी हे शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. फूट कपोल कल्पित आहे त्याने पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. त्यावर महेश जेठमलानी यांनी …

Read More »

निवडणूक आयोगः ठाकरे गटाने युक्तीवादावेळी शिंदे गटाच्या नियुक्त्यांवर घेतला आक्षेप २० जानेवारीला पुन्हा होणार सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने …

Read More »

काँग्रेसचा आरोप, मोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल देशातील आर्थिक, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीच काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षात सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची मोठी किंमत देशातील गरिब जनतेला मोजावी लागत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे ‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. देशातील ४० टक्के संपत्ती केवळ १ टक्के गर्भश्रीमंतांकडे तर …

Read More »

अजित पवार म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या सांगण्यात १०० टक्के तथ्य अर्थसंकल्प झालेला असताना इतके पैसे कोठून आणणार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेत नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अखेर शिवसेनेकडून अंतिम करण्यात आल्यानंतर आणि नाशिक व नागपूर जागेची काँग्रेस आणि शिवसेनेने आपापसात आदलाबदल केली. नाशिकच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती भूमिका राहणार याची माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी मुंबईतील सिमेंट रस्त्याच्या निविदेबाबत नुकतीच शिवसेना …

Read More »

अजित पवारांचा खोचक टोला, दावोसहून मोठी गुंतवणूक आणाच पण आल्यावर… हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही तसा केंद्रसरकारने प्रयत्न करावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला गेले आहेत. त्यांनी राज्यात गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त निधी आणावा, मात्र दावोसवरून आल्यानंतर आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे असा उपरोधिक टोला अजित पवार यांनी लगावत कारण काही लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारे प्रकल्प बाहेर जाऊ देणे आणि काही लाख तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले हे त्रिवार सत्य …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचे भाकित, फडणवीसांना आवडणार नाही मात्र पुढील मुख्यमंत्री विखे-पाटील… विधान परिषद निवडणूकीतील तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोरीवरून केले वक्तव्य

विधान परिषद निवडणूक जाहीर झाली. मात्र या निवडणूकीत सर्वाधिक चर्चेची निवडणूक ठरत आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. या निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेसने उमेदवार जाहीर करूनही सदर उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज न भरता मुलगा सत्यजीत तांबे यास अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरायला लावला. तसेच पाठिंब्यासाठी भाजपाकडे मदत मागणार असल्याचे वक्तव्य केले. …

Read More »