महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदासाचे नाव घेतले, तसेच शिवाजी महाराज हे जून्या काळातील आदर्श होते, अशी विधाने करत मुंबईच्या उभारणीत बिगर मराठी लोकांचे योगदान जास्त असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी राज्यातील भाजपाने भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात कोणतीच भूमिका घेतली नाही. …
Read More »‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती
ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. राज्यात मागील काही …
Read More »शशिकांत शिंदे यांची खंत, चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, चर्चा करण्यात अर्थ नाही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर प्रदेशाध्यक्ष शिंदे यांचे मत
विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी भावना व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीकरणाचं सूत्र कसं असेल याबाबत चर्चेत ठरवलं जाणार होतं. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही जर-तर वर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मेट्रो स्लॅब दुर्घटनेची जबाबदारी विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर
वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन लाइनवरील मुलुंड मधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली आहे. मुलुंडच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरु असून स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री …
Read More »अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर
ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते, त्याच पममबीर सिंगाचे भ्रष्टाचारी कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालयाने त्याला ज्या पद्धतीने अपमानास्पद रित्या बडतर्फ केले आहे, त्यावरून त्यांचे चारित्र्य आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पडले आहे. त्याच्या …
Read More »अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत ‘विजाभज’ आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योगासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य जपानच्या वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांच्या भेटी दरम्यान दिले आश्वासन
महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. भाजपा सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते पण कोणताच प्रकल्प पुर्ण करत नाही व जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. एक महामार्ग बनवण्यास एवढी वर्षे लावून सरकार कंत्राटदारांचे खिसे भरत आहेत का? असा सवाल काँग्रेस खासदार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा महायुती सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली लाचखोरीप्रकरणी मंत्र्याचे कार्यालय सिल केल्याची घटना अत्यंत गंभीर
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …
Read More »६ वर्षे झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याची बदली करा, आधीच पर्यायी नियुक्तीही करा सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांचे सर्व विभागांना आदेश
मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी सर्व विभागाच्या आस्थापना आणि सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेस निर्देश देत सर्व विभागातील सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी आणि सहायक कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक व लघुलेखक यांच्या बदल्या एप्रिल-मे २०२६ करण्यात येणार आहे. मात्र या बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya