राजकारण

अजित पवार म्हणाले, नगराध्यक्ष- सरपंचच कशाला मुख्यमंत्री, राष्ट्रपतींची निवडही जनतेतून… बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला खोचक सवाल

Ajit Pawar

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडूण देण्याचा फडणवीस सरकारच्या काळातील निर्णय रद्दबातल ठरविला होता. मात्र राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडीने रद्दबातल केलेला निर्णय पुन्हा लागू केला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच …

Read More »

संजय राऊत म्हणाले, दोघाचंच मंत्रिमंडळ पाह्यला का? बेकायदेशीर आहे माझी टीका झोंबते ना पण मी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्यावतीने बोलतोय

राज्यातील महाविकास आघाडीला घालवून शिंदे-फडणवीस यांचे सरकार नव्याने स्थानापन्न झाले. या नव्या सरकारला राज्यात येवून १५ दिवस होवून गेले. तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच मंत्रिमंडळाने आतापर्यत दोनवेळा मंत्रिमंडळ बैठक घेत निर्णय घेतले. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, दंगलीचे पाप झाकण्याबरोबरच जगाने ‘तरंगता गुजरात’ पाहिला स्व. अहमद पटेलांवर भाजपाकडून गलिच्छ आरोप

काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपाने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर भाजपाकडून …

Read More »

औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्कामोर्तब औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर

अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीवरून सर्वचस्थरातून टीका व्हायला लागल्यानंतर …

Read More »

नव्या सत्ताधाऱ्यांचे नऊ दिवस संपेना, आधी माईक, नंतर चिठ्ठी आणि आता कानात कुसफुस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेच्या कानात बोलत करून दिली आठवण एमएमआरडीएची

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवून देत नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी झाला. मात्र या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्य मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. मात्र या सरकारच्या नव्याचे नऊ दिवस काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

शरद पवार म्हणाले; हुकूमशाही विरोधातील आवाज उठविण्याची किंमत मोजतोय सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोक त्याविरोधात आवाज उठवतात

जगामध्ये जिथे – जिथे हुकुमशाही आली, ती लयास गेली. श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंब देशाबाहेर निघून गेले. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोकं त्याविरोधात आवाज उठवतात, हे श्रीलंकेत दिसून आले असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध …

Read More »

छगन भुजबळ यांचा टोला; सरपंच-नगराध्यक्ष थेट लोकांमधून पण मुख्यमंत्री तर फुटीर गटातून ओबीसींची लोकसंख्या ही ५४ टक्के असून ओबीसींच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळालेच पाहिजे

देशात ओबीसींची लोकसंख्या ही ५४ टक्के असून ओबीसींच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळालेच पाहिजे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर आहे. कोरोनामुळे अद्यापही देशात जनगणना होऊ शकली नाही. आता देशात जनगणना सुरु करून त्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करून घ्यावी अशी …

Read More »

अखेर “या” कारणामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले… राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसल्याने विधिमंडळाचा निर्णय

राज्यात सत्तांतर होत बंडखोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. मात्र शिंदे-फडणवीसांचा शपथविधी होवून १५ दिवस उलटले तरी या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे उद्या जावून विधिमंडळ अधिवेशन बोलावले तर विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे कोण जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे …

Read More »

मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते संकेताला धरून नव्हते पण… नामांतरप्रश्नी केली भूमिका स्पष्ट

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नामांतर करण्याचा घेतलेला निर्णय नव्याने स्थापन झालेल्या शिंद-फडणवीस सरकारने स्थगित केला. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली. या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नामांतर करायचे असून तो बेकायदा निर्णय कायदेशीर ठरविण्यासाठी उद्या सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेवून निर्णय घेणार …

Read More »

राष्ट्रवादी म्हणते, बुलेट ट्रेनला मंजुरी म्हणजे गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार प्रवक्ते महेश तपासे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी एमएमआरडीएची बीकेसीतील जागा अडवून ठेवण्यात आली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत निर्णय घेत एमएमआरडीएची जागा केंद्र सरकारला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेत त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांवर …

Read More »