राज ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधान मोदी चांगला कारभार करतायत तर विवेक ओबेरॉय, आर माधवन दुबईत का? मोदींवर चित्रपट काढणारे विवेक ओबेरॉय आणि आर माधवन दुबईचे नागरिक

ज्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चित्रपट काढला ते अभिनेते विवेक ओबेरॉय आणि दुसरे चित्रपट अभिनेते आर. माधवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला पुन्हा महान बनवत आहेत असा विश्वास असूनही हे दोन्ही अभिनेत्यांनी दुबईचे नागरिकत्व घेत तिकडेच राहण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

शनिवारी मुंबईत मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या २० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना, राज ठाकरे यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात हजारो उद्योगपती आणि व्यावसायिकांनी “आपले सामान बांधून देश सोडला” असल्याचेही सांगितले.

राज ठाकरे हिंदी चित्रपटसृष्टीवर निशाणा साधताना म्हणाले की, काही अभिनेते भारतात येतात, ‘धुरंधर’सारख्या सरकारी चित्रपटांमध्ये काम करतात आणि दुबईला परत जातात, असेही यावेळी सांगितले.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. मात्र, तो परदेशात, दुबईत राहतो! मोदींच्या काळात सर्व काही कसे महान झाले आणि देश कसा बदलला, याबद्दल सतत बोलणारा आर. माधवन आपल्या कुटुंबासह दुबईला जातो, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जर या कलाकारांना देशावर प्रेम असेल, पंतप्रधानांवर प्रेम असेल आणि ते देशाला पुढे नेत आहेत यावर त्यांचा विश्वास असेल, तर ते परदेशात का राहत आहेत? असा सवालही यावेळी केला.

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, अनेक कलाकार ऑनलाइन टीकेच्या भीतीने सार्वजनिक विषयांवर गप्प राहणे पसंत करतात. अनेक कलाकार म्हणतात की, स्वतःला व्यक्त न करणेच बरे, कारण त्यांना ट्रोल केले जाते, असेही यावेळी सांगितले.

नीट पेपरफुटी आणि परीक्षेतील अनियमिततेविरोधातील विद्यार्थी आंदोलनाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आंदोलन करणारे विद्यार्थी भरकटले असून त्यांना सरळ मार्गावर आणण्याची गरज आहे, या पंतप्रधान मोदींच्या सूचनेशी राज ठाकरे यांनी असहमती दर्शविले.

दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान पंतप्रधानांविरुद्ध झालेल्या अपमानास्पद घोषणांना संबोधित करणाऱ्या त्यांच्या व्हिडिओचा हा संदर्भ होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आंदोलनादरम्यान त्यांना आणि त्यांच्या दिवंगत आईला अपमानास्पद भाषेचा सामना करावा लागला आणि “गैरसमज झालेल्या मुलांना” न्यायालयात खेचल्याने हा प्रश्न सुटणार नाही, त्याऐवजी त्यांना माफ करणे योग्य ठरेल.

अपमानास्पद भाषा अस्वीकार्य आहे हे राज ठाकरे यांनी मान्य केले, परंतु पंतप्रधानांनी प्रथम त्यांच्याच पक्षातील, भाजपाच्या नेत्यांना आवर घालावा असेही यावेळी सुनावत कोणीही इतक्या खालच्या पातळीची भाषा वापरू नये. पण त्यांनी आपल्याच पक्षातील लोकांना हे सांगितले पाहिजे, अशी आशाही यावेळी सांगितले.

मनसे नेते राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थी आंदोलनातील मोठी गर्दी आणि वक्तृत्व हे सरकारच्या अपयशामुळे वर्षानुवर्षे साचलेल्या रागाचे आणि निराशेचे प्रतिबिंब होते. या मुलांच्या अपेक्षा चिरडल्या जात आहेत. जेव्हा त्यांना त्यांच्या आजूबाजूला काहीही अनुकूल होताना दिसत नाही, तेव्हा त्यांनी काय करावे? असा सवालही यावेळी सांगितले.

संसदेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज ठाकरे यांनी जबाबदार असलेल्यांकडून उत्तरदायित्वाची मागणी केली.

ज्यांनी विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईचे आदेश दिले, ते कधी माफी मागणार? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी केला.

About Editor

Check Also

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती, अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *