श्रीनिवास वनगा अखेर परतले पण सूर पुन्हा बदललेः आता शिंदे सांगतील ते काम करू उद्धव ठाकरे देव माणूस असे सांगत व्यक्त केली होती खंत

पालघर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी कापण्यात आली. तसेच श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी कापल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा यांनी आणि घात झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे हे देव माणूस असल्याचे सांगत ठाकरे यांना सोडून शिंदेंसोबत गेल्याची चूक झाल्याचे सांगत प्रसारमाध्यमांच्या कॅमऱ्यासमोर ढसाढसा रडले. त्यानंतर नाराज झालेले श्रीनिवास वनगा हे अचानक अज्ञातवासात गेले. मात्र ४८ तासात पुन्हा त्यांनी पुन्हा कुटुंबियांशी संपर्क साधत घरी आले आणि पुन्हा विश्रांतीसाठी म्हणून निघून गेले.

या कालावधीत पोलिस प्रशासनासह स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही उलटसूलट चर्चेला उधाण आले. या पार्श्वभूमीवर मात्र आज श्रीनिवास वनगा हे पुन्हा आपल्या घरी आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी श्रीनिवास वनगा यांचे सूर पूर्णतः बदलल्याचे दिसत होते.

यावेळी बोलताना श्रीनिवास वनगा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्याने मी काहीसा नाराज झालो होतो. त्यामुळे मी माझ्या नातेवाईंकावडे गेलो होतो. मला पालघर किंवा डहाणू येथून उमेदवारी मिळण्याची मला अपेक्षा होती. पण तिकिट न मिळाल्याने मी नाराज होतो. मात्र दरम्यानच्या काळात मी कोणत्याही राजकिय पक्षाशी किंवा ठाकरे गटाशी संपर्क साधला नाही. माझे तिकिट कापण्यासाठी काही जणांनी षढयंत्र रचले. त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करावी अशी माझी अपेक्षा असल्याचे सांगत आता एकनाथ शिंदे हे जे काम सांगतील ते काम मी करेन असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना श्रीनिवास वनगा म्हणाले की, जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये राजेंद्र गावित यांनी माझ्या विरोधात कट रचल्याचा आरोप करत कालपासून माझ्या मुलाची प्रकृती ठिक नाही. त्याचबरोबर आईही आजारी आहे. मला कुटुंबासाठी जगायचे आहे. त्यामुळे शांत राहुन पुढीची भूमिका घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.

बेपत्ता होण्यापूर्वी शिंदेवर आरोप तर उद्धव ठाकरे यांचे कौतुक
श्रीनिवास वनगा यांनी बेपत्ता होण्यापूर्वी शिंदे यांच्यासोबत गेलो पण माझा राजकिय घात झाल्याचा आरोप करत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देव माणुस असल्याचे कौतुकोद्गार काढले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या लोकांनी दिशाभूल केली. मी यापुढेही प्रामाणिक राहुन काम करत राहीण आणि मी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारले असता श्रीनिवास वनगा पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे हे चांगले व्यक्ती आहेत. पण मी आज कोणत्याही पक्षात जाण्याच्या मनस्थितीत नाही. तसेच सर्व आमदार जेव्हा गोव्यात नाचत होते. तेव्हा मी त्यांच्यात नव्हतो, मी माझ्या खोलीवर होतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काहीही काम नव्हते. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यांच्यामुळेच मी मतदारसंघात १२०० कोटी रूपयांचा निधी आणू शकलो असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची माहिती, राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा

राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *