भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडं जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याचं क्रॉंक्रिटीकरण करावं, यासाठी सातत्यानं पाठपुरावा होऊनही या रस्त्याचं काम सुरु झालं नाही. याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानचे ट्रस्ट मंडळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून झालेले नाही हे खूप दुर्दैवी आहे. ज्या शहरामध्ये करोडो रुपयांची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात होत आहे. नितीन गडकरी यांच्याकडं आम्ही कधीही गेलो की ते कामाला नाही म्हणत नाहीत. बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं काम झालं आहे. पण दुर्दैव आहे भोर येथील श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानकडील दीड किलोमीटरचा रस्ता हा गेल्या कित्येक वर्षांपासून झालेला नाही. तिथल्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. मात्र, या रस्त्यावरील खड्डे देखील बुझवले जात नाहीत. प्रशासनाकडून पीएमआरडीचा प्लॅन असल्याचं सांगितलं जात आहे. आज लाखो लोक बनेश्वरला जात असतात. सगळ्यांना रस्त्यामुळं मोठा त्रास सहन करावा लागतो. एका दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी वणवण करावी लागत आहे. या रस्त्यासाठी मंत्रालयापासून सर्वच ठिकाणी निवेदन देण्यात आलं असताना देखील रस्त्याची डागडुजी केली जात नाही. जोपर्यंत या रस्त्यासाठी वर्क ऑर्डर निघत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,गेल्या कित्येक महिन्यापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. पण दीड किलोमीटरच्या रस्त्याचं काम होत नाही. बनेश्वर हे आमच्या श्रद्धेचा विषय असून या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मात्र, तसं घडताना दिसत नाही. या रस्त्याचं काम व्हावं यासाठी शासनाकडं देखील पाठपुरावा केला आहे. मात्र, रस्त्याचं काम झालं नाही. भिजत घोंगडं राहिलेलं काम पूर्ण व्हावं म्हणून बेमुदत उपोषणाच्या आंदोलनाचं अस्त्र उगारावं लागल्याचेही यावेळी सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, बनेश्वर हे अस्थेचे ठिकाण आहे. दीड किमीचा हा रस्ता होत नाही, हे दुर्दैव आहे. गेले ६ महिने आम्ही यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, किमान दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे, पण सरकारकडून मोठा प्रोजेक्ट आहे असे सांगितले जाते पण हा प्लॅन आमच्या पदरात कधी पडणार असा सवाल यावेळी उपस्थित केला.
📍जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ⏭️ 09-04-2025 ➡️ भोर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उपोषण – लाईव्ह https://t.co/hbvV0sBt9o
— Supriya Sule (@supriya_sule) April 9, 2025
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे बनेश्वरला शाळांचा सहली जात असतात, लाखो भाविक जात असतात. पण आम्ही सर्व जणांनी ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा केला असला तरी हा रस्ता होत नाही. मागच्या वेळी हा रस्ता करुण देणार असा शब्द प्रशासनाने दिला होता. दीड किमीच्या रस्त्यासाठी हे सरकार नागरिकांना छळत आहे. आपण काही नवीन रस्ता मागत नाहीये, त्यामुळे परवानगीचा काही संबंध येत नाही. किमान रस्त्यावरील खड्डेतरी बुजवले पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. असेही सांगितले.
शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर ही आमच्या सर्वांच्या निष्ठेची जागा आहे. या विषयामध्ये आम्हाला राजकारण आणायचे नाही. तिथे अनेक जण कायम जात असतात, महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या श्रद्धचे स्थान असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya